राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय ललन सिंह यांचा राजीनामा
नवी दिल्ली : जेडीयूचे नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. शुक्रवार, दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललनसिंह यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ललनसिंह यांनी पदाचा राजीनामा देत नितीशकुमार यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे नितीशकुमार हेच जदयूचे पुन्हा अध्यक्ष झाले. परंतु ललन सिंह यांनी राजीनामा का दिला, हे स्पष्ट झाले नाही.
देश नितीशकुमार यांच्याकडे आशेने पाहत आहे. नितीशकुमार यांनी त्यांना काही नको असे सांगितले आहे. मात्र, ते जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत असतील, असे जदयूचे नेते म्हणाले.
ललन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार जदयूचे अध्यक्ष बनले. यावेळी जदयूच्या कार्यकर्त्यांनी देश का पीएम कैसा हो, नितीश कुमार जैसा हो अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी नितीशकुमार आणि ललन सिंह यांच्यात काहीही अंतर नसल्याचे म्हटले.
२००३ पासून नितीशकुमार पाचवे अध्यक्ष
२००३ पासूनचे जदयूचे नितीशकुमार हे पाचवे अध्यक्ष असतील. शरद यादव २०१६ पर्यंत जदयूचे अध्यक्ष होते. त्यानंतर नितीशकुमार अध्यक्ष झाले होते. नितीश कुमार यांच्यानंतर आरसीपी सिंह अध्यक्ष होते. आरसीपी सिंह यांच्यानंतर ललन सिंह यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले होते. आता पुन्हा नितीशकुमार जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.