नरेद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर डिजिटल इंडिया नावाने कॅम्पेनिंग आणि कामही सुरू केले. त्यानुसार देशात इंटरनेटचा स्पीड वाढविण्यासाठी आणि ऑनलाईन सुविधा, शॉपिंग व बुकिंगच्या सेवा क्षेत्रात मोठी वाढ झाली. स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील इंटरनेट युजर्सची संख्या लक्षणीय वाढली. गेल्या १० वर्षात देशातील इंटरनेट युजर्संच्या संख्येत मोठी वाढ झाली. माहिती प्रसारण व ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी संसदेत माहिती दिली.
मोबाईल युजर्सची
संख्या ११६.५९ कोटी
३१ मार्च २०१४ पर्यंत देशात टेलीफोन कनेक्शन ९३.३ कोटी एवढे होते तर ३१ मार्च २०२४ पर्यंत ही संख्या ११९.८७ कोटीवर पोहोचली आहे. यात एकूण २८.४८ टक्के वाढ झाली आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत देशात मोबाइल युजर्संची की संख्या ९०.४५ कोटी एवढी होती तर ३१ मार्च २०२४ पर्यंत ही संख्या ११६.५९ कोटीपर्यंत पोहोचली. यातही २८.९० टक्के वाढ झाली आहे.
इंटरनेट सब्सक्रिप्शन
सरकारच्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०१४ पर्यंत देशात इंटरनेट सब्सक्रिप्शन २५.१६ कोटी होते जे ३१ मार्च २०२४ पर्यंत ९५.४४ कोटीपर्यंत पोहोचले. यामध्ये तब्बल २७९.३३ टक्क्यांची वाढ झाली. ब्रॉडबँड सब्सक्रिप्शन ३१ मार्च २०१४ पर्यंत ६.०९ कोटी होते. जे ३१ मार्च २०२४ पर्यंत ९२.४१ कोटी झाले आहेत. म्हणजेच गेल्या १० वर्षात १४१७.४१ कोटींनी ही संख्या वाढली.