बीसीसीआय जगात सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
जगात क्रिकेट अनेक देशांत खेळले जाते. अधिकृतपणे १०८ देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मान्यता दिली आहे. ज्यामध्ये १२ पूर्ण आणि ९६ सहयोगी सदस्यांचा समावेश आहे. याचा अर्थ जगात एकूण १०८ क्रिकेट बोर्ड आहेत. परंतु या सर्वांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) प्रभाव सर्वाधिक आहे. कारण आज टॉप-१० क्रिकेट बोर्डांपैकी ८५ टक्के एकट्या बीसीसीआयची कमाई आहे. त्यामुळे बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया कमाईत दुस-या स्थानावर आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयची एकूण संपत्ती सुमारे २.२५ अब्ज डॉलर म्हणजे १८,७०० कोटी रुपयांची आहे. ही रक्कम ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या २८ पट जास्त आहे. बीसीसीआयच्या प्रचंड कमाईचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). आयपीएलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या कमाईतही प्रचंड वाढ होत आहे. आता बीसीसीआयने महिला आयपीएलही सुरू केली आहे.

कमाईत ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर
क्रिकेट ऑस्ट्रेलिया कमाईत दुस-या स्थानावर आहे. मीडिया रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाकडे सुमारे ७९ दशलक्ष डॉलर्स आहेत. म्हणजे ६६० कोटी रुपये. त्यांच्याकडे बिग बॅश लीगसारखी महान लीगही आहे. इंग्लंडचे क्रिकेट बोर्ड तिस-या क्रमांकावर आहे. मीडिया रिपोर्टनुसार इंग्लंडकडे सुमारे ५९ दशलक्ष डॉलर्स आहेत. म्हणजे ४९२ कोटी रुपये.

जगातील १० श्रीमंत क्रिकेट बोर्ड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ : २.२५ अब्ज डॉलर म्हणजे १८,७०० कोटी रुपये
क्रिकेट ऑस्ट्रेलिया :  ७९ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६६० कोटी 
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड : ५९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४९२ कोटी रुपये
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड :  ५५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४५९ कोटी 
बांगलादेश क्रिकेट बोर्ड : ५१ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४२६ कोटी रुपये
क्रिकेट दक्षिण आफ्रिका : ४७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३९२ कोटी रुपये
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड : ३८ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३१७ कोटी रुपये
श्रीलंका क्रिकेट बोर्ड : २० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १६७ कोटी रुपये
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड : १५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १२५ कोटी रुपये
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड : सुमारे ९ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७५ कोटी रुपये.