जोसेफ औन लेबनॉनचे नवे राष्ट्रपती

yongistan
By - YNG ONLINE
बेरुत : वृत्तसंस्थाी
लेबनॉनचे लष्करप्रमुख जोसेफ औन यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. संसदेने गुरुवार, दि. ९ जानेवारी २०२४ रोजी मतदान घेतले. त्यामुळे दोन वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. हे पाऊल इराण समर्थित हिजबुल्लाचा प्रभाव कमी झाल्याचे द्योतक आहे. माजी राष्ट्रपती मिशेल औन यांचा उत्तराधिकारी नेमण्याचा १३ वा प्रयत्न होता. त्यांचा कार्यकाळ २०२२ मध्येच संपला होता. 

इस्रायली आणि लेबनॉनी दहशतवादी समूह हिजबुल्ला यांच्यात गेल्या १४ महिन्यांपासून संघर्ष सुरू होता. त्यानंतर युद्धविराम करार झाला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या निवडीबाबत मतदान पार पडले. सध्या लेबनॉन अडचणीत आहे. आता देशाच्या पुनर्रउभारणीसाठी आंतरराष्ट्रीय मदतीची गरज आहे. अशावेळी ही निवड झाली. औन हे अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या पसंतीचे उमेदवार म्हणून ओळखले जाते. लेबनॉनला या देशांची मदत हवी आहे. जेणेकरून इस्रायलला निर्धारित दक्षिणी लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास भाग पाडता येईल आणि देशाचा पुनर्विकासाला गती देता येईल.