भारताची भरारी, बनला आयफोन हब

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेची दिग्गज कंपनी अ‍ॅप्पलने भारतात आयफोन असेंबल करण्यात मोठी गरुड भरारी घेतली आहे. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेने चीनमधून अ‍ॅप्पल असेंब्लिंग करण्याचा उद्योग भारतात हलविल्यानंतर हा प्रकार घडला. गेल्यावर्षी अ‍ॅप्पलने सुमारे २२ अब्ज डॉलरचे (१.२ कोटी रुपये) आयफोन्स तयार केले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. अ‍ॅप्पल आता चीनच्या बाहेर अ‍ॅप्पलचे उत्पादन करीत आहे आणि भारत आता अ‍ॅप्पल फोन उत्पादनात ग्लोबल हब झाला आहे.
अ‍ॅप्पल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताने भरारी घेतली आहे. गेल्यावर्षी अ‍ॅप्पल आयफोन कंपनीने येथे सुमारे २२ अब्ज डॉलरचे उत्पादन केले आहे. म्हणजेत १.८ कोटी रुपयांचे आयफोन तयार केले आहेत. हे उत्पादन गेल्यावर्षी ६० टक्क्यांहून अधिक आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत आता आयफोनचे असेब्लिंग भारतात होत आहे. फेब्रुवारीत ‘रेसिप्रोकल’ टॅरिफ योजनेंतर्गत घोषणा केल्यानंतर भारतातून अमेरिकेसाठी आयफोन शिपमेंटमध्ये वेग आला आहे. अ‍ॅपलचे सरासरी उत्पादन आणि निर्यात संपूर्ण आर्थिक वर्षात मार्चपर्यंत वाढली आहे.

२० टक्के उत्पादन आता भारतात
अ‍ॅप्पल कंपनी आता जगभरात विकणा-या दर ५ आयफोनपैकी १ आयफोनची भारतात निर्मिती करीत आहे. म्हणजे आयफोनचे २० टक्के उत्पादन आता भारतात होत आहे. सरकारदेखील ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात या फोनचे उत्पादन वाढवित आहे. चीन नव्हे भारत बनला हब
अ‍ॅप्पल आणि त्याचे पुरवठादार फॉक्सकॉन, विस्ट्रॉन (आता टाटाकडे) आणि पेगाट्रॉन हे सर्वच जण आता चीनऐवजी भारतात आयफोनचे उत्पादन करण्यात रस घेत आहेत. त्यामुळे आयफोनचे प्रोडक्शन वेगाने होत आहे. कोविड-१९ मध्ये लॉकडाऊनमुळे अ‍ॅप्पलच्या सर्वात मोठ्या फॅक्टरीला फटका बसला होता.

फॉक्सकॉनच्या फॅक्टरीत 
होतेय सर्वाधिक उत्पादन
भारतात आयफोनची सर्वाधिक असेंब्लिंग दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या फॅक्टरीत होत असते. त्याशिवाय विस्ट्रॉनचा भारतातील बिझनेस ताब्यात घेणा-या टाटा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आयफोनची असेब्लिंग होत आहे. त्यामुळे भारतातील आयफोनच्या निर्मितीचे प्रमाण वाढत चालले आहे.