बिरुदेव, अदिबाची युपीएससीत यशस्वी भरारी

yongistan
By - YNG ONLINE
जिथे आज समाज हिंदू-मुस्लिम, मंदिर-मस्जिद, जाती-धर्म, पंथ या वादात अडकला आहे, तिथे काही तरुण स्वतःचं भविष्य घडवत, समाजासाठी नवा संदेश देत आहेत.
अशाच युवकांपैकी एक म्हणजे बिरदेव डोणे – ज्यांनी मेंढरं राखण्याच्या पारंपरिक व्यवसायातून थेट यूपीएससीच्या यशस्वी वाटेपर्यंतचा अविश्वसनीय प्रवास पार केला आहे. अन् दुसरी म्हणजे यवतमाळ येथील अँटो चालकाची मुलगी अदिबा अनम हिने महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आएएएस एक्झाम पास केला आहे.

विशेष म्हणजे, निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव आपल्या आई-वडिलांना त्यांच्या मेंढपाळीच्या व्यवसायात मदत करत होते. एका हातात काठी, दुसऱ्या हातात स्वप्न – असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्याचे युग स्पर्धेचे आहे. एकेकाळी मराठी तरुणांना कठीण वाटणारी यूपीएससी, एमपीएससी परीक्षा आता अनेक जण सहज यशस्वी करून दाखवत आहेत. विशेष म्हणजे जिथे शिक्षण पूर्ण करणे कठीण वाटते अशा वातावरणातही अनेक तरुण, तरुणी यशाची भरारी घेत आहेत, हेच बिरुदावली आणि सामान्य कुटुंबातील अदिबा अनम या यवतमाळच्या तरुणीने दाखवून दिले आहे. या दोघांसह अशाच प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या देशातील नव्या दमाच्या तरुण, तरुणींना सलाम.