देशातील बॅंकांमध्ये दाव्याविना ६७ हजार ३ कोटी पडून

yongistan
By - YNG ONLINE
दावा न केलेली रक्कम, ३० जून २०२५ पर्यंतची आकडेवारी 
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
देशातील सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आहेत. बँकांमध्ये (खासगी बँकांसह) एकूण दावा न केलेल्या ठेवींची रक्कम ३० जून २०२५ पर्यंत ६७ हजार ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार यापैकी ५८ हजार ३३०.३६ कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहेत तर ८ हजार ६७३.७२ कोटी रुपये खासगी बँकांमध्ये जमा आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) अव्वल स्थानावर आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया १९ हजार ३२९.९२ कोटी रुपये दावा न केलेले आहेत. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कडे ६ हजार ९१०.६७  कोटी रुपये आणि कॅनरा बँकेकडे ६ हजार २७८.१४  कोटी रुपये आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

खासगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँकेकडे सर्वाधिक दावा न केलेली रक्कम २ हजार ६३.४५ कोटी रुपये आहे. त्यानंतर एचडीएफसी बँकेकडे १ हजार ६०९.५६ कोटी रुपयांचा आणि ऍक्सिस बँकेकडे १ लाख ३६ हजार ०.१६  कोटी रुपयांवर कोणताही दावेदार नाही.