मोदींचा घानाकडून सर्वोच्च सन्मान

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घानाने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, दि. ३ जुलै २०२५ रोजी घाना दौ-यावर होते. या दौ-यात दोन्ही देशांमध्ये चार वेगवेगळ््या सामंजस्य करारांवर स्वाक्ष-या झाल्या. भारत आणि घाना मिळून मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरोधात एकत्र काम करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. घानाकडून सन्मानित होणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.