निमित्त अप्स बंदीचे, बेरोजगारी, भ्रष्टाचार आर्थिक मंदीवरून सरकारवर रोष
काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये सोशल मीडिया अप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्या विरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरात जेन-झेड युवा वर्गाने सोमवार दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी उग्र हिंसक विरोधी प्रदर्शन केले. यावेळी शेकडो युवा थेट नेपाळी संसदेत घुसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी आंदोलकांवरसुद्धा फायरिंग केली. नेपाळ पोलिसांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ कर्फ्यू लावला. जेणेकरुन प्रदर्शनकारी निवासस्थानी घुसू नये.
प्रदर्शनकारी बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीसाठी सरकारला जबाबदार ठरवत आहेत. विराटनगर, भरतपूर आणि पोखरा येथे प्रदर्शन झाले. पंतप्रधान केपी ओली सरकारने ४ सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि यासारख्या २६ सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली. युवकांचे म्हणणे आहे की, बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे.
व्हीपीएनमधून बॅन तोडण्याचा प्रयत्न
जे लोक फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सामान विकायचे, त्यांचा बिझनेस थांबला आहे. यूट्यूब आणि गीत हबसारखे प्लेटफॉर्म चालत नसल्याने मुलांचे शिक्षण अडचणीत आले आहे. परदेशात राहणाऱ्या लोकांशी बोलणे महाग आणि कठीण बनले. लोकांमध्ये इतकी नाराजी आहे की, बऱ्याच लोकांनी व्हीपीएनमधून बॅन तोडण्याचा प्रयत्न केला.
अशी नेपाळमध्ये स्थिती
सरकारने टिकटॉकवर बॅन लावलेला नाही. त्यावेळी लोकांनी या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकून आंदोलन सुरु केले. नेत्यांची मुले ऐशोरामात आणि सर्वसामान्य बेरोजगार अशी नेपाळमध्ये स्थिती आहे. भरपूर व्हिडिओमध्ये # रिस्टोअर आवर ईंटरनेट हॅशटॅग व्हायरल झाला.
जेन-झेडे स्कूल यूनिफॉर्म घालून सहभागी
प्रदर्शनात जेन-झेड स्कूल यूनिफॉर्म घालून सहभागी झाले. २८ वर्षावरच्या मुलांना प्रदर्शनात येऊ दिले नाही. त्यांनी सोशल मीडिया चालू करणे, भ्रष्टाचार बंद करणे, नोकरी आणि इंटरनेट एक्सेसची डिमांड ठेवली.
सेक्शन ६ अंतर्गत कर्फ्यू
आंदोलक नियंत्रणाबाहेर जाऊन संसद परिसरात पोहोचले, त्यावेळी काठमांडू डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसने संपूर्ण न्यू बानेश्वरमध्ये कर्फ्यू लावला. मुख्य जिल्हाधिकारी छाबीलाल रिजाल यांनी सेक्शनमध्ये ६ अंतर्गत दुपारी १२.३० पासून कर्फ्यू लावला. रात्री १० वाजेपर्यंत हा कर्फ्यू असेल.
