कॅरिको, वेइसमन यांना
वैद्यक क्षेत्रातील नोबेल
स्टॉकहोम : यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा २ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे. कॅटालिन कॅरिको आणि र्ड्यू वेइसमन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-१९ विरुद्ध प्रभावी ठरलेली एमआरएनए लस विकसित करणे शक्य झाले.
या महत्त्वपूर्ण निष्कर्षांद्वारे एमआरएनए ही लस आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी कशा पद्धतीने काम करते, याबाबत माहिती मिळविण्यास मदत झाली. जो काळ मानवी जीवनासाठी अत्यंत कठीण ठरला, त्या काळात एक महत्त्वपूर्ण लस विकसित करण्यासाठी कॅटालिन कॅरिको आणि र्ड्यू वेइसमन यांनी अभूतपूर्व योगदान दिले. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यामुळे त्यांना २०२३ चा वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार देण्यात आला.