२५ नोव्हेंबर : यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी

yongistan
By - YNG ONLINE
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी याच दिवशी केली. तसेच कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि भालजी पेंढारकर यांचा जन्मही आजच्या दिवशीचाच.
-२५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीच्या शेवटच्या बैठकीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समारोपाचे भाषण केले. 
१६६४ : अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जलदुर्गचे महत्त्व आहे. याचा विचार करून शिवरायांनी सागरी किल्ल्याची निर्मिती केली. सिंधुदुर्ग त्यापैकीच एक. यासाठी मालवणजवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट निवडले. आजच्याच दिवशी या किल्ल्याची पायाभरणी केली. या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी ५०० खंडी शिशाचा वापर करण्यात आला. या किल्ल्यासाठी १ कोटी होन खर्च आला. या किल्ल्याच्या उभारणीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. जवळपास साडेतीनशे वर्षे समुद्राच्या लाटा झेलत हा किल्ला उभा आहे. या किल्ल्याचे क्षेत्र ४८ एकर आहे आणि तट दोन मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट आणि रुंदी १२ फूट आहे या तटास ठिकठिकाणी बुरूज आहेत. 

१८६७ : डायनामाईडचे पेटंट : जगातील सर्वांत घातक स्फोटक अशी ओळख असलेल्या डायनामाईटचे पेटंट आजच्याच दिवशी आल्फ्रेड नोबेल यांना मिळाले. त्यांनीच डायनामाईटचा शोध लावला होता. या स्फोटकात जगाला नष्ट करण्याची क्षमता. मात्र, त्यांनी मानवतावादी दृष्टिकोनातूनत ्याचा वापर करण्याचे ठरविले.

१८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा जन्म : प्रख्यात नाटककार, पत्रकार अशी त्यांची ओळख. केसरीमधून त्यांनी लेखन केले. स्वयंवर, मानापमान, भाऊबंदकी, सवाई माधवराव यांचा मृत्यू यासारखी नाटके लिहिली. नाट्याचार्य खाडिलकर म्हणून ते ओळखले जातात. १९२५ मध्ये त्यांनी नवाकाळची स्थापना केली. मुंबईतील गिरगावातून हे वृत्तपत्र प्रसिद्ध होते.  

१९२१ : भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म : प्रख्यात नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, नाट्यनिर्माते, नेपथ्यकार अशी ओळख. दुरितांचे तिमीर जावो, पंडितराज जगन्नाथ अशी त्यांची नाटके.

१९४८ : एनसीसीची स्थापना : राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे नॅशनल कॅडेट कोअर ही जगातील देशांतर्गत नागरी संरक्षण आणि नागरी सेवेसाठी कार्य करणारी विद्यार्थी संघटना. २६ नोव्हेंबर १९४८ रोजी विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना केली. सैन्याविषयी आवड निर्माण करणे हा कार्यक्रम होता. तसेच देशाप्रती निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे  हा या संघटनेचा उद्देश होता.