आणखी ३खासदार निलंबित, संख्या १४६ वर

yongistan
By - YNG ONLINE

नवी दिल्ली : सभागृहाचा अवमान केल्याच्या आरोपावरून गुरुवार, दि. २१ डिसेंबर रोजी लोकसभेतील आणखी तीन खासदारांना निलंबित करण्यात आले. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस खासदार नकुल नाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना चालू हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या १४६ झाली आहे. यापैकी एकूण १०० खासदार लोकसभेतील आहेत. 

लोकसभेचे कामकाज १ दिवस आधी गुंडाळले
लोकसभेचे कामकाज गुरुवारी (२१ डिसेंबर) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंत (२२ डिसेंबर) चालणार होते. लोकसभेचे कामकाज  नियोजित वेळेच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी तहकूब करण्यात आले. अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू झाले होते. या अधिवेशनात सुमारे ७४ टक्के कामकाज झाले असून १८ विधेयके मंजूर करण्यात आली, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.