२० डिसेंबर : संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी

yongistan
By - YNG ONLINE
स्वच्छतेची शिकवण देऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत गाडगे महाराज यांची २२ डिसेंबर रोजी पुण्यतिथी. अडोल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका झाली. मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.  संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे निधन झाले.

१९२४ : अडोल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका
अ‍ॅडॉल्फ हिटलर हा ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला जर्मन राजकारणी होता.  जो १९३३ ते १९४५ मध्ये त्याच्या आत्महत्येपर्यंत जर्मनीचा हुकूमशहा होता. तो नाझी पक्षाचा नेता म्हणून सत्तेवर आला होता. त्याच्या हुकूमशाहीच्या काळात त्यांनी १ सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण करून युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू केले. संपूर्ण युद्धात लष्करी कारवायांमध्ये त्यांचा जवळून सहभाग होता. आजच्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबर १९२४ रोजी अडोल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका झाली होती. 

१९५६ :  संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी
स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचे मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव येथे झाला. डेबूजी झिंगारजी जानोरकर असे त्यांचे नाव होते. गाडगेबाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेले. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासून तयार केलेला पोषाख त्यांचा असायचा. गाडगे महाराज हे सामाजिक रुढी आणि परंपरेवर जोरदार प्रहार करत होते. किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले. गाडगेमहाराज यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. गाडगे महाराजांचे २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. 

१९८८ : मतदानाचे वय २१ वरून १८ पर्यंत कमी करण्याचे विधेयक मंजूर
१९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्यात आले. राजीव गांधी यांचा कार्यकाळ अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी लक्षात ठेवला जातो. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे १८ वर्षांच्या तरुणांना मतदानाचा अधिकार देण्याचा. २० डिसेंबर १९८८ रोजी मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यासाठी संसदेत कायदा मंजूर करण्यात आला.