२८ डिसेंबर : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

yongistan
By - YNG ONLINE
२८ डिसेंबर १८८५ रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष  आणि उद्योजक रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. त्याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्मदिन आहे.

१८८५ : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना  
आजच्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर १८८५ रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. याच दिवशी मुंबईत काँग्रेसचे पहिले अधिवेशन देखील पार पडले. काँग्रेसच्या स्थापनेत एका माजी ब्रिटिश सनदी अधिकारी अ‍ॅलन ऑक्टेव्हिअन  ूम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एलेन ओक्टेवियन  ूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशॉ वाचा यांनी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.  सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होते (लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर १९२० ते १९४७ या काळात काँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधींनी केले. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बनर्जी होते तर फिरोजशाह मेहता, सुरेन्द्रनाथ बनर्जी, रोमेशचंद्र दत्त, बद्रुद्दीन तयबजी, एस. सुब्रमण्यम अय्यर आणि इतर नेत्यांचा पहिल्या अधिवेशनात समावेश होता. काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली. 

१९३२ : धिरुभाई अंबानी यांचा जन्म 
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांनी व्यावसायिक हुशारीने गरिबीतूनवर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापन केला. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणा-या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. धीरूभाई त्यांचे वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासह एडनमध्ये राहत. आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए. बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पाय-या ओलांडून गेले. १९५९ साली धीरूभाई यांनी १५ हजार रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर मुंबई येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करू लागले. १९६६ साली धीरूभाई अंबानी यांनी अहमदाबाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरुवात केली. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा आदी देशात निर्यात करण्यास सुरुवात केली. 
१९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्­नासाठी सुमारे ५८ हजार लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरुवात केली. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५ हजार कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. २००० साली २५ हजार कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. 
१९३७ :  उद्योजक रतन टाटा यांचा जन्म 
देशातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणारे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक रतन टाटा यांचा जन्मदिन. टाटा समुहाचे अध्यक्ष राहिलेल्या रतन टाटा यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांना नवजाबाई टाटा यांनी त्यांचे पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर दत्तक घेतले होते. रतन टाटा यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून घेतले आणि माध्यमिक शिक्षण कॅथेड्रलमधूनच घेतले. त्यानंतर त्यांनी जॉन कॅनन कॉलेजमधून आर्किटेक्चरमध्ये बीएससी केले. त्यानंतर कॉर्नेल विद्यापीठातून १९६२ मध्ये कम्युनिकेशन इंजिनीअंिरग आणि १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमाचे शिक्षण घेतले. रतन टाटा १९९१ ते २०१२ या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. २८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडले. 
१९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार १९६२  ते १९७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वत:च्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले.