ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचे आजच्याच दिवशी १८०९ साली निधन झाले. मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. प्रसिद्ध नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. संगीतकार ए. आर. रहमान, तसेच माजी क्रिकेटर कपिल देव यांचा वाढदिवस आहे.
१८०९ : ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचे निधन
त्यांचा जन्मदिवस ४ जानेवारी जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक ब्रेल दिन हा अंध आणि दृष्टिबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी साजरा करण्यात येतो. ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस निवडण्यात आला आहे. लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. २०१९ पासून जगभरात ४ जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
१८१२ : आज मराठी पत्रकार दिन
मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. १८३२ साली मुहूर्तमेढ रोवत दर्पण सुरू केले. हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
१९२८ : विजय तेंडुलकर यांचा जन्म
प्रसिद्ध नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म आजच्याच दिवशी १९२८ साली मुंबई येथील मुगभाट, गिरगांव येथे झाला. वडील धोंडोपंत तेंडुलकर लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या नाटकांनी तर रंगभूमीच नव्हे तर समाजकारण, राजकारणातही वादळ आणले. शांतता! कोर्ट चालू आहे. सखाराम बाईंडर, काशीराम कोतवाल, गिधाडे आदी नाटके चांगलीच गाजली. विजय तेंडुलकर यांनी चित्रपट सृष्टीतही मोठे योगदान दिले. सामना, सिहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणा-या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार, तर 1983 मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९५९ : कपिल देव यांचा जन्म
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. कपिल देव यांनी भारताकडून १९७० भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केले. त्यांनी १९८४ मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला. यादरम्यान त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना २२५ एकदिवसीय सामन्यात २५३ विकेट्स आणि ३ हजार ७८३ धावा केल्या आहेत.
१९६७ : ऑस्कर पुरस्कार विजेते गायक ए. आर. रहमान यांचा जन्म
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमानचा आज वाढदिवस. ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ए.आर. रहमान यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ए.आर. रहमान यांचे खरे नाव ए. एस दिलीप कुमार आहे. रहमान यांना आजवर दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार आणि १३ फिल्मफेअर पुरस्कार (दक्षिणात्य चित्रपट) मिळाले आहेत.
२०१७ : भारतीय अभिनेते ओम पुरी यांचे निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने खूप प्रसिद्धी कमावली. ओम पुरींनी त्यांच्या वेगवेगळ््या पात्रांनी मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली. १९८३ मध्ये आलेल्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली.