युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती, मराठी पत्रकार दिन

yongistan
By - YNG ONLINE

२०० वर्षांपूर्वी, ज्ञानाधिष्ठित समाज, विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, एक प्राध्यापक म्हणून वर्गात शिकवून समाज सुधारणा नाही, तर त्यासाठी समाजसुधारणेचे एक प्रभावी साधन उभा करावे लागेल, या विचारातून भाऊ महाजन यांच्या मदतीने ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहुर्तमेढ रोवली आणि देशातील हे पहिले मराठी वृत्तपत्र ठरले. त्यामुळेच बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते.
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या पोंभुर्ले येथे झाला. त्यांचे अवघे वय ३४ वर्षांचे. या काळात त्यांनी विपूल कार्य केले. कमी कालावधीत त्यांनी १० भाषा अवगत केल्या. फे्रंच भाषेवर प्रभूत्व मिळविले. त्यामुळे त्यांचा फ्रेंच सरकारने सन्मान केला. लहानपणापासून वाचन, अभ्यासाचा छंद, मराठी, संस्कृत भाषेचा अभ्यास. मराठी, संस्कृृत, बंगाली, गुजराती, कन्नड, फारसी, तेलुगू, फ्रेंच लॅटिन, ग्रीक आदी १० भाषांचे ज्ञान होते. गणित, ज्योतिष शास्त्र यातही पारंगत. कोकणातील शिलालेखे, ताम्रपट यावर शोधनिबंध लिहिले. कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी त्यांची निवड झाली होती. तसेच ते शिक्षणाधिकी होते. त्यांनी पाठ्य अभ्यासक्रम तयार केला.  
समाजाचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून राज्यात पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या वृत्तपत्रातील अर्धा मजकूर मराठी आणि अर्धा मजकूर इंग्रजी होता. दर्पण सुरू करताना लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे हाच उद्देश असल्याचे सांगितले. साडेआठ वर्षे दर्पण चालवले. वृत्तपत्र चालविण्याची तळमळ, वृत्तपत्र चालविण्यामागील हेतू याचा विचार करून त्यावेळचे गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जांभेकरांना जस्टिस आॅफ पीस असा किताब देऊन सन्मानित केले. ते बोलके नव्हे, तर कर्ते सुधारक होते. त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल. ते महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील सुधारक होते. 
१८४० मध्ये दिग्दर्शन नावाचे पाक्षिक काढले. दिग्दर्शनमधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास या विषयांवरील लेख, नकाशे, आकृत्यांसह प्रकाशित केले. यातून लोकांची आकलनशक्ती वाढविण्याचे काम केले. मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये जांभेकर प्राध्यापक होते. लोकप्रबोधनाचे माध्यम म्हणून त्यांनी दर्पण सुरू केले. दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड हे त्यांचे विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शनमधून मोठ्या प्रमाणात लेखन केले. जांभेकर यांनी १८३० ते १८४६ या कालावधीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. १८४६ मध्ये वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निधन झाले. 

-सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्त्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची स्थापना केली. 
-एसियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहणारे ते पहिले भारतीय होते. 
-ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी १८४५ मध्ये काढली. 
-विज्ञानिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. अर्थात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज उभा करण्याचे त्यांचे २०० वर्षांपूर्वीचे स्वप्न होते. त्यामुळे ते दृष्टे समाजसुधारक होते. 
-विविध समस्यांवर चर्चा घडविण्यासाठी त्यांनी नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना केली. 
-भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथा बंद पडाव्यात, त्याला आळा बसावा. अशी त्यांची भूमिका होती. विधवा विवाह, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. 
-एक लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून दर्पणकडे पाहिले
-यातून विधवा पुनर्विवावाहाचा प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न
बौद्धिक विकास आणि विद्याभ्यासावर भर
-उपयोजित ज्ञानाचा प्रसार व्हावा ही तळमळ
भारतीय समाजातील, हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथा बंद पडाव्यात, याला आळा बसावा, यासाठी प्रयत्न