भारत व्योमेत्र रोबोट अवकाशात पाठवणार

yongistan
By - YNG ONLINE

इस्रो पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. २०२५ मध्ये इस्रोचे मुख्य मिशन गगनयान लाँच होणार आहे. त्याआधी रोबोट अवकाशात पाठवला जाणार आहे. या रोबोटचे नाव व्योमित्र आहे. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने संस्कृत शब्द व्योम आणि मित्र एकत्र करून रोबोटला व्योमित्र असे नाव दिले आहे. व्योमित्र रोबोटला मानवी शरीराप्रमाणे तयार करण्यात आले आहे. अवकाशात मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, याची चाचणी आणि परीक्षण करण्यासाठी आधी रोबोट अवकाशात पाठवण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेपूर्वीच्या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी इस्रोने महिला रोबोट अंतराळात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 
भारताची महिला रोबोट अंतराळवीर व्योमित्र इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात उड्डाण करणार आहे. मानवरहित व्योमित्र मिशन २०२४ म्हणजेच या वर्षाच्या तिस-या तिमाहीत पाठवले जाणार आहे तर गगनयान, भारतीय अंतराळवीरांना घेऊन जाणारी देशातील पहिली मानवयुक्त अंतराळ उड्डाण मोहीम २०२५ मध्ये प्रक्षेपित होणार आहे.
गगनयान प्रक्षेपण वाहन म्हणजेच रॉकेटची तयारी पूर्ण झाली असून यान प्रक्षेपित करण्यासाठीची सर्व तयारीही इस्रोकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच गगनयानचे लॉंचिंग होणार आहे.