१ फेब्रुवारी १८९३ रोजी थॉमस एडिसन यांनी पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती केली. स्पेस सेटल कोलंबियाचा स्फोट झाल्याने भारतीय वंशाच्या कल्पना चावलासह ६ अंतराळवीर मृत्युमुखी पडले. यासोबतच इतरही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
१६८९ : गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
१८३५ : मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत
१८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८९३ : थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९६४ : प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९२ : भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसन याला फरारी घोषित केले.
२००३ : अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
२०१३ : जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.