रोमियो हेलिकॉप्टर नौदलात

yongistan
By - YNG ONLINE
भारतीय नौदलात एमएच-६० आर सी हॉक हेलिकॉप्टर नवा योद्धा बुधवार, दि. ६ मार्च २०२४ रोजी सामिल झाला. त्यामुळे भारताची समुद्री ताकद आणखी वाढली. या हेलिकॉप्टरमुळे समुद्राच्या तळाशी असणा-या शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्यात भारतीय नौदलाला मदत होणार आहे. कोची येथील आयएनएस गरुडमध्ये नवीन स्क्वॉड्रन बनवून हेलिकॉप्टर सामील करण्यात आले.
 भारतीय नौदल ६ मार्च २०२४ ला एमएच ६० आर सी हॉक मल्टी-रोल हेलिकॉप्टर आपल्या ताफ्यात समाविष्ट करेल. भारतीय नौदल अँटी सबमरिन हेलिकॉप्टर सामील करणे ही तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक मोठे पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी युद्ध, जमिनीवरील युद्ध, शोध आणि बचाव कार्य तसेच वैद्यकीय स्थलांतर आणि समुद्रातील जहाजांना पुरवठा करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. २०२० मध्ये अमेरिकेसोबत एमएच ६० आर २४ हेलिकॉप्टरचा करार करण्यात आला होता. यापैकी सहा हेलिकॉप्टर भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले आहेत. या हेलिकॉप्टरचे स्क्वॉड्रन आयएनएस ३३४ या नावाने ओळखले जाईल. हे हेलिकॉप्टर समुद्रात शत्रूच्या पाणबुड्या शोधून नष्ट करण्यात मदत करते.

युद्धनौका आयएनएस 
विक्रांतवर तैनात करणार
एमएच ६० आर सी हॉक मल्टी-रोल रोमियो हेलिकॉप्टर स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात करण्याची भारतीय नौदलाची योजना आहे. हे हेलिकॉप्टर फ्रिगेट्स, कॉर्वेट्स किंवा विनाशकांपासूनदेखील ऑपरेट केले जाऊ शकते. रोमिओची निर्मिती अमेरिकन कंपनी स्कॉर्स्की करते. या रोमियो हेलिकॉप्टरचे एकूण पाच प्रकार आहेत.