राज्यात महिला मतदार संख्या वाढली

yongistan
By - YNG ONLINE


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात २०२४ मनध्ये महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. मागील वर्षात राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली. आता राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आहेत. मागील चार निवडणुकांच्या तुलनेत यंदा १ हजार पुरुषामागे ९२३ महिला अशी लक्षणीय वाढ झाली आहे.

२००४, २००९, २००१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे. राज्यात २००४ मध्ये पुरुष व महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ मध्ये आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोेंदणीत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र. २०१९ मधील मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली.