नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारतीय लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. आता ते भारतीय लष्कराचे ३० वे लष्करप्रमुख बनले आहेत. जनरल मनोज पांडे हे आजच लष्करातून निवृत्त झाले. यानंतर उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांची जागा घेतली. नवे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी हे जम्मू-काश्मीर रायफल्सचे अधिकारी आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी हे मध्य प्रदेशचे रहिवासी असून त्यांनी रिवा येथील सैनिक स्कूलमधून शिक्षण घेतले. जानेवारी १९८१ मध्ये ते प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सामील झाले आणि १५ डिसेंबर १९८४ रोजी जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या १८ व्या बटालियनमध्ये नियुक्त झाले.
उपेंद्र द्विवेदी ३० वे लष्कर प्रमुख, सूत्रे स्वीकारली
By - YNG ONLINE
June 30, 2024
Tags: