सुजाता सैनिक राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव

yongistan
By - YNG ONLINE


मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक  यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणा-या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या १९८७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. 
सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. रविवारी संध्याकाळी ५ वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली.