नवी दिल्ली : भारतात दिल्ली, मुंबई, बंगळुरू ही महागडी शहरे म्हणून ओळखली जातात. परंतु जगात यापेक्षा अनेक शहरे महाग आहेत. त्यामध्ये हॉंगकॉंगचा पहिला क्रमांक लागतो. लेटेस्ट मर्सर्ज २०२४ च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग रिपोर्टनुसार बाहेरून कामासाठी येणा-या लोकांसाठी हॉंगकॉंग शहर सर्वांत महाग आहे. त्यानंतर सिंगापूर, तिस-या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी स्वीत्झर्लंडमधील ज्युरीख, जिनेव्हा, बेसल आणि बर्न या शहरांचा समावेश होतो. विशेष म्हणजे महागड्या टॉप ३० शहरांमध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश नाही.
हॉंगकॉंग शहरात वन बीएचके घरासाठई २० हजार ते ३५ हजार हॉंगकॉंग डॉलर द्यावे लागतात. त्याचे भारतीय चलनात सव्वादोन लाख ते ४ लाख रुपये होतात. एका हॉंगकॉंग डॉलरची किंमत १०.७० रुपये आहे. हॉंगकॉंगमध्ये १ लिटर दूध २५ ते ३० हॉंगकॉंग डॉलरला मिळते. भारतीय चलनात याची किंमत २७० ते ३२० रुपये एवढा दर आहे. ब्रँडेड जीन्ससाठी ५३०० ते १०,५०० रुपये लागतात. घरातील वीज आणि पाण्यासाठी २० ते २८ हजारांचा खर्च येतो. इंटरनेटसाठी २२०० ते ५५०० रुपये लागतात. हेअरकटसाठी १७०० ते ५२०० रुपये लागतात. घरातील कामासाठी फुलटाईम हेल्पर ठेवला तर त्याला महिन्याला ५० हजार पगार द्यावा लागतो. तर एका तासासाठी ७०० ते १५०० रुपये द्यावे लागतात.