मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात बुधवार, दि. १९ जून २०२४ पासून पोलिस भरती सुरू होत आहे. विविध पदांसाठी होणा-या भरतीत एका पदासाठी सरासरी सुमारे १०१ अर्ज आले आहेत. एकूण १७हजार ४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकिलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश असून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे.
राज्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत असून १७४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज म्हणजेच एका जागेसाठी तब्बल १०१ अर्ज आलेले आहेत. प्राप्त अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. पण दुर्दैवाने आपल्या प्रगत महाराष्ट्रात याची चर्चा होणार नाही. कारण हे विषय सर्वसामान्यांचे, गोरगरिबांच्या पोरांचे आहेत. आज सर्वच राजकीय पक्षांनी ख-या अर्थाने चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचेही विषय कधीतरी मुख्य चर्चेत येतील, अशी अपेक्षा त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली.
मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, यावर आज जोरदार चर्चा होत आहे. मात्र बेरोजगारीवर चर्चा होत नाही. इंजिनियरिंग, डॉक्टरकी, वकिलीसारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेटत नाही, म्हणून पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणा-या युवांची की युवांना रोजगार उपलब्ध न करू शकणा-या व्यवस्थेची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.