स्पेनने जिंकला युरो कप

yongistan
By - YNG ONLINE
सर्वाधिक वेळा कप जिंकण्याचा विक्रम
लंडन : वृत्तसंस्था
विम्बल्डननंतर युरो कपच्या फायनलमध्ये रविवार, दि. १४ जुलै २०२४ रोजी रात्री उशिरा स्पेनच्या संघाने इंग्लंडचा २-१ ने पराभव करून युरो कपवर आपले नाव कोरले. विजेतेपदासह स्पेनने मोठा विक्रम केला. यावेळी त्यांनी चौथ्यांदा युरो कप जिंकला. मात्र, इंग्लंडने या स्पर्धेत नकोसा विक्रम केला. 

इंग्लंडच्या संघाचा युरो कपच्या फायनलमध्ये पराभव झाला. इंग्लंडवर सलग दुस-यांदी ही नामुष्की ओढवली. मागच्या हंगामात इंग्लंडचा संघ इटलीकडून पराभूत झाला होता. नियोजित वेळेत सामना १-१ ने बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये इटलीने इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला होता. यावर्षी स्पेनने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे सलग दोन फायनलमध्ये पराभवाची नामुष्की ओढवलेला इंग्लंड पहिला देश ठरला. 

स्पेनचा ४ वेळा जिंकण्याचा विक्रम
इंग्लंडला पराभूत करून या विजेतेपदासह स्पेनने चौथ्यांदा युरो कप जिंकला. त्यामुळे सर्वाधिक वेळा युरो कप जिंकणारा स्पेन पहिला देश बनला. या अगोदर स्पेन आणि जर्मनी दोन्ही संघ ३ विजेतेपदासह संयुक्त अव्वलस्थानी होते. मात्र, चौथ्यांदा विजय प्राप्त करून स्पेनने नवा विक्रम प्रस्थापित केला.