२५ जून संविधान हत्या दिवस घोषित

yongistan
By - YNG ONLINE
 दिल्ली : तिस-यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने १२ जुलै २०२४ रोजी मोठा निर्णय घेत २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर अधिसूचना पोस्ट करत याबाबत माहिती दिली. २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली होती. माध्यमांचा आवाज दाबला होता. भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. इतिहासात २५ जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता जाण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचा आरोप केला जातो. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, राजनारायण यांसारखे अनेक नेते इंदिरा गांधी यांच्या धोरणांचे मुख्य विरोधक होते. त्यांनी सरकारविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला.