-दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारित्झबर्ग शहरातील सिटी ओव्हल क्रिकेट मैदानावर धावांचे शतक करणा-यास आणि एकाच डावात ५ बळी घेणा-या खेळाडूंना मैदानावर एक झाड लावावे लागते.
-२८ जानेवारी १९६८ ते ६ जुलै १९६९ या दीड वर्षांत बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाच वेळा बदल झाले.
-बांगलादेश जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू राष्ट्र असून तेथील १,२४,९२,४२७ व्यक्ती हिंदू धर्म पाळतात.
-एरबस ए ३४०-५०० प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते.
-इ. स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले.
-दुस-या महायुद्धाच्या काळात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंब टाकण्याचा निर्णय अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांचा होता.
-३१ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी मराठा साम्राज्यातील दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या वसईच्या तहाने दुस-या इंग्रज-मराठा युद्धाची ठिणगी पडली.
-अशोकाच्या शिलालेखात नमूद केल्याप्रमाणे कलिंगच्या युद्धातील प्रचंड जीवित हानी पाहिल्याने सम्राट अशोक याने परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.