हाथरस मध्ये चेंगराचेंगरी., १२१ ठार

yongistan
By - YNG ONLINE
सत्संगात भीषण दुर्घटना, मृतांमध्ये सर्वाधिक महिला 
हाथरस : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंगळवार, दि. २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. सत्संगात ही भीषण दुर्घटना घडली. भोलेबाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. मृतांमध्ये सर्वाधिक महिलांची संख्या आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. 

सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ हून अधिक जणांनी जीव गमावल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या जास्त आहे आणि अद्यापही अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.