ऐतिहासिक वाघनखे सातारा येथे

yongistan
By - YNG ONLINE

लंडनच्या म्युझियममधून आणल्या वाघनख्या

सातारा : प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनखांचे बुधवार, दि. १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशीदिवशी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात वाघनखे आणल्या. 
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जात असून साता-यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखेभारतात कधी येणार याची उत्कंठा आता संपली असून विशेष विमानाने ती आज सकाळी मुंबईत पोहोचली. त्यानंतर साता-यात आणली. 
महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही १६ व्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि किर्तीची साक्ष देत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या शिवरायांच्या वाघनखांचे आज लंडनहून भारतात आगमन झाले. ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता साता-यात दाखल झाली आहेत. आयशर गाडीतून ही वाघनखे पोलिस बंदोबस्तात साता-यात दाखल झाली.