सूर्यकुमार टी-२० चा कर्णधार

yongistan
By - YNG ONLINE
पांड्याकडून उपकर्णधारपदही काढले
मुंबई : प्रतिनिधी 
श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ रोजी निवड करण्यात आली. टी-ट्वेंटी संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली तर वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच असेल. महत्वाचे म्हणजे वनडे आणि टी-२० संघाचे उपकर्णधारपद शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले. हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. 
हार्दिक पांड्याने टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे उपकर्णधारपद भूषवले होते. हार्दिक पांड्याचे नाव रोहित शर्माच्या टी-२० मधील निवृत्तीनंतर चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी सूर्यकुमार यादवचे नाव चर्चेत आले. निवड समितीनेही सूर्यकुमार यादवच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची वनडे आणि तीन सामन्याची टी-२० मालिका होणार आहे. २७ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. टी-२० चे सर्व सामने पल्लेकेले येथे होणार आहेत तर वनडेचे सामने कोलंबो येथील मैदानात होणार आहेत.