सिनात्रा थायलंडच्या नव्या पंतप्रधान

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : थायलंडला नवा पंतप्रधान मिळाला आहे. यावेळी थायलंडच्या संसदेने पैतोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधानपदासाठी शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी निवड केली. अवघ्या ३७ व्या वर्षी त्या थायलंडच्या पंतप्रधान झाल्या. त्या थायलंडच्या आतापर्यंतच्या सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने संविधानाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेथा थविसिन यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ  केले होते. त्यानंतर नव्या पंतप्रधाांची निवड करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने माजी गुन्हेगाराला मंत्रिमंडळात स्थान देऊन नैतिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप श्रेथा थविसिन यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान, थायलंडच्या नव्या पंतप्रधान पैतोंगटार्न या थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांची सर्वात लहान मुलगी आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी यापूर्वी पंतप्रधानपद भूषवले आहे. वडिलांशिवाय त्यांची मावशी यिंगलक यांनीही थायलंडचे पंतप्रधानपद भूषवले. पैतोंगटार्न या देशातील सर्वांत तरुण आणि दुस-या महिला पंतप्रधान आहेत.