३ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE

राज्यातील पोलिस अधिका-यांचा होणार गौरव
१७ पोलिस कर्मचा-यांना पोलिस शौर्य पदक, ३९ जणांना पोलिस पदक
मुंबई : प्रतिनिधी 
पोलिस खात्यातील उल्लेखनीय कार्यासाठी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला बुधवार, दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदके देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील ३ पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ प्रदान करण्यात आले. यासह राज्यातील १७ पोलिस अधिका-यांना आणि कर्मचा-यांना ‘पोलिस शौर्य पदक’ तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलिस पदक’ असे राज्यातील एकूण ५९ पोलिसांना पदके प्रदान कण्यात आली.
विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’मध्ये राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, संचालक राजेंद्र बालाजीराव डहाळे, सहायक पोलिस आयुक्त सतीश राघवीर गोवेकर यांचा समावेश आहे. राज्यातील १७ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले. पोलिस शौर्य पदकांत उपविभागीय पोलिस अ धिकारी डॉ. कुणाल शंकर सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक दीपक रंभाजी आवटे, पोलिस उपनिरीक्षक (मरणोत्तर) कै. धनाजी तानाजी होनमाने, नाईक पोलिस शिपाई नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना, पोलिस शिपाई शकील युसुफ शेख, पोलिस शिपाई विश्वनाथ सामैय्या पेंदाम, विवेक मानकू नरोटे, मोरेश्वर नामदेव पोटावी, कैलाश चुंगा कुलमेथ, कोटला बोटू कोरामी, कोरके सन्नी वेलादी, महादेव विष्णू वानखेडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज मिलिंद तारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल नामदेवराव देव्हाडे, पोलिस उपनिरीक्षक विजय दादासो सकपाळ, मुख्य शिपाई महेश बोरू मिच्छा, पोलिस शिपाई समय्या लिंगय्या आसाम यांचा समावेश आहे. 

३९ पोलिसांना पोलिस पदक
यासोबतच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलिस पदक’ राज्यातल्या ३९ पोलिसांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणा-या कर्मचा-यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. यात राज्यातील ११ कर्मचा-यांचा समावेश आहे. यंदा ५९ जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्यातील ६ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.