९८ वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत

yongistan
By - YNG ONLINE
तब्बल ७ दशकांनी दिल्लीत घुमणार मराठी आवाज
पुणे : प्रतिनिधी 
आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जाहीर केले. आज झालेल्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तब्बल ७ दशकांनंतर राजधानी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग आला आहे. या निमित्ताने मराठी आवाज आता राजधानी दिल्लीत घुमणार आहे. दरम्यान,  या निर्णयामुळे राज्यातील पुस्तक प्रकाशकांनी प्रकाशक संघाकडे नाराजी व्यक्त केली.
साहित्य महामंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेकडून करण्यात येणार आहे. सरहदने २०१४ मध्ये पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. आता राजधानी दिल्लीत संमेलन होणार आहे. फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. हे संमेलन तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागात संमेलन  आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. या अगोदर ९७ वे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे पार पडले होते.