लंडन : इंग्लंडच्या जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून, तो लॉर्डस्वर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सलग दुस-या डावात शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शतक झळकावले आणि ३४ शतकांसह इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके झळकवणारा खेळाडू ठरला. रुटने अॅलिस्टर कुकचा विक्रम मोडित काढला.
जो रूट : ३४ शतके
अॅलिस्टर कुक : ३३ शतके
केविन पीटरसन : २३ शतके
वॅली हॅमंड : २२ शतके
कॉलिन कॉर्डरे : २२ शतके
लॉर्डसवर सर्वाधिक धावा
करणारा फलंदाज जो रूट
जो रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्डस्वर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकत त्याने पहिले स्थान मिळवले आहे. रुटने लंडनच्या लॉर्डस मैदानावर २०१५ कसोटी धावा करण्याचा ग्रॅहम गूचचा विक्रम मोडीत काढला. आता रूटने लॉर्डस्च्या मैदानावर २०२२ कसोटी धावा केल्या आहेत. तसेच लॉर्डसवरील कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा जो रूट हा चौथा फलंदाज ठरला आहे.