सामाजिक प्रश्नमंजुषा

yongistan
By - YNG ONLINE
*सामाजिक प्रश्नमंजुषा*

 प्र.१. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आई व वडिलांचे नांव काय होते ?
 उत्तर - चिमनाबाई व गोविंदराव
 प्रश्न २.  महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या दत्तक पुत्राचे नांव काय होते ?
 उत्तर - यशवंत 
 प्रश्न 3.  यशवंत कुणाचा मुलगा होता ?
 उत्तर - विधवा ब्राम्हण काशीबाई चा 
 Q.4.  सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला ?
 उत्तर - नायगांव खंडाळा तालुका जिल्हा सातारा
 Q.5.  महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला?
 उत्तर - कटगुण सातारा जिल्हा
 प्र.६.  महात्मा फुले यांच्या जिवनावर कोणत्या विचारवंताच्या पुस्तकाचा प्रभाव पडला ?
 उत्तर - थॉमस पेन 
 प्र.७.  महात्मा फुले यांच्या मावस बहिणीचे नांव काय होते?
 उत्तर - सगुणाबाई क्षीरसागर
 प्र.८.  महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाच्या वेळेस त्यांचे वय किती होते ?
 उत्तर - 13 व 9 वर्ष 
 प्र.९. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे लग्न कोणत्या तिथीला व इ.स. मध्ये झाले ?
 उत्तर - फाल्गुन वद्य पाच शके १७६२ इ.सन १८४० मध्ये झाले.
 प्र.१०.  सावित्रीबाई फुले यांच्या वडीलाचे नांव काय होते ?
 उत्तर - खंडोजी नेवासे पाटील
 प्र.११.  महात्मा फुले यांचे पूर्वीचे आडनाव काय होते होते ?
 उत्तर - गोर्‍हे
 प्र.१२.  गोविंदराव फुले यांच्या वडीलाचे नांव काय होते ?
 उत्तर - शेटीबा 
 प्र.१३.  शेट्टीबा यांना किती मुले होती ? नांव काय ?
 उत्तर - तीन मुले होती.१) कृष्णाजी गोरे २)राणोजी  गोरे ३) गोविंद गोरे 
 प्र.१४.  शिटीबा यांच्या वडीलाचे नांव काय होते ?
 उत्तर - कोंडाजी 

 प्र.१५. कोंडाजी च्या वडीलाचे नांव काय होते ?
 उत्तर - रानोजी
 प्र.१६. राणोजी च्या वडिलांचे नांव काय होते ?
 उत्तर - बुधोजी 
 प्र.१७.  बुधोजी यांना कोणत्या आडनावाने ओळखले जात होते ?
 उत्तर - चौगुले
 प्र.१८.  गोविंदराव यांचे आडनाव फुले का झाले ?
  उत्तर -  पुणे शहरात शेटीबा फुलांचा व्यवसाय करू लागल्यामुळे त्यांचे आडनाव फुले  झाले.
 प्र.१९.  गोविंदराव फुले यांना किती मुले होती ? नांव काय ?
 उत्तर - तीन मुले होती. १) राजाराम २)धोंडीबा ३)ज्योतिबा 
 प्र.२०.  गोविंदराव यांनी कोणाच्या सांगण्यावरून ज्योतिबा फुले यांना शाळेतून काढले ?
 उत्तर- कृष्ण देव
 प्र.२१.  कोणाच्या सांगण्यावरून गोविंदरावानी जोतिबानां परत शाळेत घातले ?
 उत्तर -  मुस्लीम मित्र मुंशी गफार बेग व मेजर लिजिंट
 प्र.२२.- महात्मा फुले यांचा जन्म केंव्हा झाला ?
 उत्तर - 11 एप्रिल 1827 
 प्र.२३. महात्मा फुले यांचा मृत्यू केंव्हा झाला ?
 उत्तर - 28 नोव्हेंबर 1890 
 प्र.२४.  सावित्रीबाई फुले यांचा जन्म केंव्हा झाला ?
 उत्तर - 3 जानेवारी 1831
 प्र.२५. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू केव्हा झाला ?
 उत्तर - 10 मार्च 1897
 प्र.२६.  सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कशामुळे झाला?
 उत्तर: प्लेग या साथीच्या रोगाने
 प्र.२७. महात्मा फुले यानां कोणाच्या लग्नात सनातन्याकडून अपमानीत करण्यात झाले होते ?
 उत्तर - परम ब्राम्हण मित्र सखाराम हरी परांजपे
 प्र.2८.  महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी अस्पृश्यानां पाण्यासाठी आपल्या घरातील विहीर  खुली केली ?
 उत्तर- इसवी सन 1849
 प्र.३०. महात्मा  फुले यांनी विधवा महिला आश्रमची स्थापना केंव्हा केली ?
 उत्तर - इसवी सन 1871
 प्र.३१ सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील महिला सहकारी कोण ?
 उत्तर - फातिमा शेख
 प्र.३२.  महात्मा फुले यांचे शस्त्र विद्येतील गुरु कोण होते?
 उत्तर- अद्यक्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे
 प्र.३३.  महात्मा फुले यांना 'महात्मा' ही पदवी समाजाने कोणत्या वर्षी दिली?
 उत्तर - 11 मे 1888
 प्र.३४.  महात्मा फुले यांनी आपला वसीयत नामा केंव्हा लिहिला ?
 उत्तर - 10 जुलै 1871

 प्र.35.  फुले दांपत्ये यांनी आपल्याच शाळेत शिकलेल्या कोणत्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षक केले ?
 उत्तरः धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार
 प्रश्न.36. महात्मा फुले यांनी कोणास ब्राह्मणेत्तरातील  पंडित बनवले होते ?
 उत्तर - धोंडिराम कुंभार
 प्र.३७.  महात्मा फुले यांच्या मावस बहीण सगुनाबाई क्षीरसागर यांचे निधन केंव्हा व कशामुळे झाले ?
 उत्तर - 6 जुलै 1854 कॉलरा साथीचा रोगामुळे
 प्र.३८.  महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक सगुणाबाईला त्यांच्या मृत्यू पश्चात अर्पण केले ?
 उत्तर - "निर्मिकाचा शोध" हे पुस्तक..
 प्र.३९. खादीचा पुरस्कार व प्रसार सर्वप्रथम कोणी केला ?
 उत्तर- सावित्रीबाई फुले
 प्र.४०.  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चितेला अग्नी कोणी दिला ?
 उत्तर - सावित्रीबाई फुले
 प्र.४१.  परक्याच्या मुलास दत्तक पुत्र म्हणून दत्तक घेणारे पहिले दांपत्य कोण ?
 उत्तर - फुले दांपत्य ( महात्मा फुले व सावित्रीबाई फुले)
 Q.42. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ?
 उत्तर - सावित्रीबाई फुले
 प्र.43. महात्मा फुले यांच्या जीवनावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला ?
 उत्तर - थाॅमस पेन यांचे "राईटस आॅफ द मेन"
 Q.44.   मि.& मिसेस मिचेल यांच्या पहिले अध्यापक प्रशिक्षण केंद्र  व सावित्रीबाई यानी चालवलेल्या"नॉर्मल स्कूल" मधून पहिल्या शिक्षिका होण्याचा मान कोणास जातो ?
  उत्तर - उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख
 प्र.४५.  दीडशे- पावनेदोन वर्षांपूर्वी पुणे व परिसरातील 18 शाळांचे संचलन करणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ पहिल्या मुख्याधिपिका ?
उत्तर - सावित्रीबाई फुले
 प्र.46. देशातील नव्हे आशिया खंडातील पहिली मुंलीची शाळा काढणारे दाम्पत्य  ?
उत्तर- फुले दांपत्य  1 जाने. 1848
 प्र.४७.   सावित्रीबाई फुले यांना किती भाऊ होते व भावांचे नांव काय ?
 उत्तर - 3 भाऊ १) सदूजी २) सखाराम ३) श्रीपती
 प्र.४८.   सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्याकडे कारभाराच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे पद होते ?
 उत्तर- इनामदार व नायगांवचे पाटील
 प्र.49.  महात्मा फुले यांनी विधवां महिलासाठी आश्रमाची स्थापना केव्हा केली ?
 उत्तर – इसवी सन 1871
 प्र.५०- महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या विधवा महिला आश्रमाचे संयोजक कोण होते ?
 उत्तर - सावित्रीबाई फुले
प्र.५१ - महात्मा फुले यांची पहिली पुण्यतिथी कोठे साजरी करण्यात आली व केव्हा ?
उत्तर -  पुणे शहराजवळ ओतूर येथे 1891 मध्ये
प्र.५२ - सावित्रीबाई फुले यांनी ऑगस्ट 1868 मध्ये कोणत्या दोन समाजातील पहिला अंतर जातीय विवाह घडून आणला 
उत्तर - ब्राम्हण समाजाचा गणेश व महार समाजाची सारजा यांचा
प्र.५३- सावित्रीबाई फुले यांनी 1876 -77 च्या भिषन दुष्काळामध्ये कोणत्या अन्नछत्रेची सुरुवात केली ? कोठे?
उत्तर - व्हिक्टोरिया बालकाश्रम अन्नछत्र धनकवडी येथे
प्र. ५४ - फुले दांपत्य यांच्या दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत यांच्या पहिल्या पत्नीचे नांव काय ?
उत्तर - राधाबाई
प्र. ५५ - डॉक्टर यशवंत यांच्या पहिली पत्नीचे निधन केंव्हा झाले ?
उत्तर -  1895
प्र.५६ - फुले दांपत्य डॉक्टर यशवंत यांच्या दुसऱ्या पत्नीचे  व मुलीचे नांव काय ?
उत्तर - दुसरी पत्नी- चंद्रभागाबाई
          मुलागी - लक्ष्मी उर्फ सोनी
प्र.५७ -डॉक्टर यशवंत यांची  मुलगी "लक्ष्मी"चा विवाह कोणाशी झाला ?
उत्तर - गंगाराम होले यांचे चिरंजीव बाळू यांच्याशी
प्र.५८ कामगार नेते तथा मुंबई प्रांताचे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू केंव्हा झाला ?
उत्तर - 9 फेब्रुवारी 1897
प्र.५९ - सावित्रीबाई फुले यांनी "पहिला सत्यशोधकीय विवाह" केंव्हा व कोनामध्ये घडवून आणला ? 
उत्तर - 25 डिसेंबर 1873
       सिताराम अल्हाट व राधाबाई निंबळकर या दोघात..
प्र .६०- सावित्रीबाई फुले यांनी दुसरा सत्यशोधकिय विवाह कधी व कोणाच्या दोघात घडवून आनला ?
उत्तर - 7 मे 1874 मध्ये..
    ज्ञानोबा ससाने व काशीबाई शिंदे
प्र.६१ -  फुले दांपत्ये यांनी काशीबाईचा मुलगा यशवंत यास दत्तक घेण्यापूर्वी  अगोदर कोणास दत्तक घेतले होते ?
उत्तर - शांताराम यास..
        पण तो 5-6 वर्षच जगला..
प्र. ६२- महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये स्वतंत्र ग्रंथालयाची स्थापना केव्हा केली  ?
उत्तर -  17 सप्टे. 1882
प्र.६३- महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या "स्वतंत्र ग्रंथालय" ला आज कोणत्या नावाने ओळखले जाते ?
उत्तर - पुणे लायब्ररी  
प्र.६४- सावित्रीबाई फुले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार केव्हा मिळाला ?
उत्तर - 16-11-1852 रोजी
प्र.६५- इंग्रज सरकारने फुले दांपत्य यांचा जाहीर सत्कार केव्हा केला ?
उत्तर - 16 सप्टे. 1852 रोजी

*🏵️ ही पोस्ट तुमच्या मुलांना/मुलीनां जरूर दाखवावी..*