२०२५ चे पद्म पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून सेवानिवृत्त न्यायमूर्ती जगदिशसिंह खेहर, कुमुदिनी रजनिकांत लाखिया, लक्ष्मीनारायण सुब्रम्हण्यम यांच्यासह गायिका शारदा सिन्हा, सुजुकीचे माजी सीईओ ओसामु सुजुकी, एम. टी. वासुदेवन नायर यांना मरणोत्तर पद्मविभूषण, अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंकज उधास, माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, साध्वी ऋतुंभरा, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासह १९ जणांना पद्मभूषण तर अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, पर्यावरण कार्यकर्ते चैत्राम पवार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश आहे.
दुव्वुर नागेश्वर रेड्डी, न्या. जगदीशसिंह खेहर, कुमुदिनी रजनीकांत लाखिया, लक्ष्मीनारायण सुब्रम्हण्यम, एमटी वासुदेवन नायर (मरणोत्तर), ओसामू सुजुकी (मरणोत्तर), शारदा सिन्हा (मरणोत्तर) अशा ७ जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. यासोबतच पंतधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर), माजी हॉकीपटू पीआर श्रीजेश, साध्वी ऋतुंभरा, अभिनेता एस. अजितकुमार, चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासह १९ जणांना पद्भूषण पुरस्कार जाहीर झाला.
या बरोबरच महाराष्ट्रातील होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांच्यासह मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यास शैली होळकर, डॉ. नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी. दत्तचनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यासह ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्करोग विशेषज्ञ डॉ. नीरजा, सामाजिक कार्यकर्ते भीम सिंग, पी. दत्तचनमूर्ती हे थाविल खेळाडू आहेत आणि एल. हंगथिंग हे शेतकरी आहेत. तसेच आर अश्विन आणि फुटबॉल दिग्गज आयएम विजयन, पॅरा खेळाडू हरविंदर सिंग आणि सत्यपाल सिंग, अद्वैत चरण गडनायक (कला), अच्यूत रामचंद्र पालव (कला), अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी), अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण), अरिजित सिंह (कला), अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग), अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण), अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण), अशोक महापात्रा (वैद्यकीय), बैजनाथ महाराज (अन्य), बेगम बाटोल (कला), भारत गुप्त (कला), बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय), सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार), चैतराम देवचंद पवार (समाजकार्य), चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण), चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी), डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण),दुर्गा चरण रणबीर (कला) यांना पद्मश्री जाहीर झाला. यामध्ये २३ महिला, १० विदेशी, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले.
महाराष्ट्रातील डॉ. विलास डांगरे हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले. ते गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करतात. मारुती चितमपल्ली हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. तसेच चैत्राम पवार वन आणि वन्यजीवाच्या संवर्धनासाठी काम करतात. तसेच गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्ययोद्धे लिबिया लोबो सरदेसाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
अरण्यऋषी म्हणून राज्याला परिचित असलेले मूळचे सोलापूरचे मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. प्रसिद्ध मराठी लेखक, वन्यजीव संशोधक आणि वनसंरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. वनसंपदा, वन्यजीवांचे जतन यासाठी त्यांनी ६ दशकांहून अधिक काळ योगदान दिले आहे.
महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री
एकूण ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यात ११ जण महाराष्ट्रातील आहेत. सुलेखनकार अच्युत पालव, उद्योग क्षेत्रातील प्रमुख चेहरा अरुंधती भट्टाचार्य, ज्येष्ठ अभिनेते अशोफ सराफ, गायिका अश्विनी भिडे देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, गायिका जसपिंदर नरुला, साहित्यिक मारुती चितमपल्ली, बासरी वादक राणेंद्र भानू मजुमदार, कृषितज्ज्ञ सुभाष खेतूलाल शर्मा, चित्रकार वासुदे कामत, डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.