बँकॉक : थायलंडने २५ जानेवारी २०२५ रोजी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. ज्या राष्ट्राने समलिंगी विवाहांना मान्यता दिली, यात दक्षिण आशियातील थायलंड हे पहिले राष्ट्र ठरले. या देशाच्या सिनेटने १८ जून २०२४ या दिवशी विवाह समानता विधेयकाला मान्यता दिली. त्यानंतर आता या देशात समलिंगी विवाह कायदेशीर असणार आहे. एलजीबीटीक्यू जोडप्यांसाठी हा दिलासा देणारा निर्णय आहे. विषमलिंगी जोडप्यांप्रमाणेच या जोडप्यांना अधिकार देणारा कायदा थायलंडमध्ये अस्तित्वात आला आहे.
२३ जानेवारी २०२५ पासून हा कायदा थायलंडने मंजूर केला. त्यामुळे आता समलिंगी विवाह करु इच्छिणारी जोडपी विवाह नोंदणी करु शकणार आहेत. तैवान आणि नेपाळनंतर आशियातला थायलंड हा तिसरा देश आहे, ज्या देशाने समलिंगी विवाहांना मान्यता दिली. हा कायदा लागू झाल्यानंतर बँकॉकमध्ये ३११ समलिंगी जोडप्यांनी लग्नाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. शेकडो जोडप्यांनी बँकॉकमध्ये विवाह नोंदणीसाठी रांगा लावल्याचे सांगण्यात आले.