ब्रम्हपुत्रा भारत, चीन, बांगलादेशसाठी वरदान

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
ब्रम्हपुत्रा नदी भारत, चीन आणि बांगलादेशसाठी वरदान आहे. ही नदी सिंचन आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण हिमालयीन प्रदेशात बर्फ वितळला की पूर येतो. अनेक उपनद्या त्यात सामील होतात. ब्रम्हपुत्रा नदी जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीनमधून जाते आणि बांगलादेशला मिळते. 
या नदीची तुलना जगाच्या एकूण लोकसंख्येशी केली तर ही २९०० किमी लांबीची नदी जगातील ३७ टक्के लोकसंख्येला प्रभावित करते. 
ब्रम्हपुत्रा नदी तिबेटमधील कैलास पर्वताजवळील मानसरोवरातून उगम पावते आणि भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून बांगलादेशात जात बंगालच्या उपसागराला मिळते. आसाममध्ये ती ब्रम्हपुत्रा किंवा लुईत म्हणून ओळखली जाते. तिबेटमध्ये तिला यारलुंग त्सांगपो म्हणून ओळखली जाते. अरुणाचलमध्ये ती सियांग/दिहांग नदी म्हणून ओळखली जाते आणि बंगालीमध्ये ती जमुना नदी म्हणून ओळखली जाते. प्रवाहाच्या बाबतीत ही जगातील नववी सर्वात मोठी नदी आहे आणि १५ वी सर्वात लांब नदी आहे.

भारतासाठी नद्या जीवनवाहिन्या आहेत. देशातील मोठी लोकसंख्या नद्यांशी थेट जोडलेली आहे. ब्रम्हपुत्रा नदीबद्दल बोललो तर ती भारताच्या ईशान्य प्रदेशासाठी वरदान आहे. यात एकट्या आसाममध्ये २७ दशलक्ष लोकसंख्येला या नदीचा फायदा होतो. या नदीला सांस्कृतिक आणि पौराणिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. वीजनिर्मिती आणि मासळीसाठीही ही नदी महत्त्वाची आहे. 

कोणत्या देशाचा किती वाटा
ब्रम्हपुत्रा नदीची एकूण लांबी सुमारे २९०० किमी आहे. चीनच्या हद्दीत सुमारे १७०० किमी वाहते आणि नंतर अंदाजे ९१६ किमीपर्यंत भारताच्या सीमेमध्ये वाहते. त्यानंतर तिस्ता नदीला जाऊन उरलेले भाग बांगलादेशच्या सीमेखाली येतात. २५ डिसेंबर रोजी चीनने तिबेटमधील यारलुंग त्सांगपो (ब्रम्हपुत्रा) नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी दिली. हा ६० हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असलेल्या थ्री गॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट वीज निर्मिती करेल. मात्र, यावर भारताने प्रश्न उपस्थित केला आहे.
ब्रह्मपुत्रेवर किती धरणे?
ब्रम्हपुत्रा नदी किंवा तिच्याशी संबंधित नद्यांवर चीनने यापूर्वीच अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. १९९८ मध्ये चीनने सर्वप्रथम यमद्रोक जलविद्युत केंद्र सुरू केले. यानंतर २००७ मध्ये झिकाँग हायड्रो पॉवर स्टेशन, त्यानंतर २०१३, २०१५ मध्ये जंगमू धरण, २०१९ आणि २०२० मध्ये विविध प्रकल्प सुरू करण्यात आले. तसेच १० हून अधिक प्रकल्प अद्याप प्रस्तावित आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर अरुणाचल प्रदेशात सुबनसिरी धरण सुरू झाले. सध्या हे काम बंद आहे तर रंगनदी धरण २००१ मध्ये बांधण्यात आले आणि रंगीत धरण २००० मध्ये बांधण्यात आले. त्याचवेळी दिबांग धरणाच्या दुस-या प्रकल्पाचे कामही रखडले. 

-तिबेटमधील कैलास पर्वतावरून ब्रम्हपुत्रेचा उगम
-बांगलादेशात बंगालच्या उपसागराला मिळते नदी
-जगातील नववी मोठी नदी आणि १५ वी लांब नदी आहे
-ब्रम्हपुत्रा नदीची एकूण लांबी २९०० कि.मी. आहे.
...................................................
भारत-चीनची लोकसंख्या 
जगाच्या ३७ टक्के
भारत आणि चीनची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ३७ टक्के असूनही, या दोन देशांत एकत्रितपणे जगातील केवळ ११ टक्के शुद्ध पाणी आहे. जलप्रदूषण आणि औद्योगिक अर्थव्यवस्थांच्या वाढत्या मागण्यांमुळे ही विसंगती आणखी वाढली आहे. पाण्याबाबत चीनच्या अस्वस्थतेचे एक कारण म्हणजे त्याची अंदाजे २३ दशलक्ष लोकसंख्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे. जलविद्युत प्रकल्प ही चीनची मजबुरी आहे. चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार चीनचे सुमारे ६० टक्के भूजल दूषित आहे. चीनच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेत जलस्रोतांच्या कमतरतेमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे.