पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई : प्रतिनिधी
लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा करावा, अशी मागणी भाजपाच्या काही आमदारांनी लावून धरली होती. ती मान्य करत राज्य सरकारने पावले उचलली असून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष समिती नेमली आहे. ही समिती अन्य राज्यांनी केलेल्या लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे.
राज्यात लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचा आरोप अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला होता. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर या प्रकरणाने उचल खाल्ली होती. आता आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणा-या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली आहे. ही समिती अन्य राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे.