आकाशतीर भारतासाठी ठरले अभेद्य भिंत

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या ८ ठिकाणांसह १३ लक्ष्यांना अचूकपणे भेदले. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व डावपेच उलटे पडले. ९ आणि १० मे रोजी रात्री पाकिस्तानने भारतीय सैन्य आणि नागरिकांवर जेव्हा क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा घातक मारा केला, त्यावेळी आकाशतीर भारतासाठी अभेद्य भिंत बनून खंबीरपणे उभा राहिला आणि भारतीयांचे संरक्षण केले. आकाशतीरने पाकिस्तानच्या सर्व हवाई ड्रोन, मिसाइल आणि इतर मायक्रो यूएव्ही आणि बाकीच्या सैन्य शस्त्रांना रोखण्याचे काम केले. त्यांना भारताच्या हवाईपट्टीत घुसू दिले नाही. 
आकाशतीर स्वदेशी प्रोडक्ट आहे. भारताची आत्मनिर्भरतेची क्षमता यातून दिसते. आकाशतीरच्या तुलनेत पाकिस्तानच्या डिफेन्स रिस्पॉन्समध्ये एचक्यू-९ आणि एचक्यू-१६ होते. भारतीय हत्यारांचा वेळेत शोध घेण्यात आणि त्यांना रोखण्यात पाकिस्तानचे डिफेन्स रिस्पॉन्स अपयशी ठरले. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.
आकाशतीर ऑटोनोमस डिफेन्स सिस्टिमने वास्तविक वेळेत टार्गेटला पूर्णपणे नेस्तनाबूत केले. ही सिस्टिम ड्रोन युद्धात सामील झाली. आकाशतीर कंट्रोल रूम, रडार आणि डिफेन्सला एक कॉमन, रिअल टाइमची एअर पिक्चर देते. त्यामुळे समन्वित एअर डिफेन्स ऑपरेशन शक्य होते. हे शत्रूंचे विमाने, ड्रोन आणि मिसाइलचा शोध घेण्यास, ट्रॅकिंग करणे आणि त्यांना निशाणा बनवण्यासाठी स्वचलितरित्या डिझाईन करण्यात आलेली सिस्टिम आहे. त्या तमाम रडार सिस्टिम, सेन्सर आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीला एकाच ऑपरेशनल फ्रेमवर्कमध्ये इंटीग्रेट करतात. आकाशतीर अनेक सोर्सपासून डेटा एकत्र करतो, त्याला प्रोसेस करतो आणि ऑटोमेटिड, रिअल टाइम एंगेजमेंटची परवानगी देतो. आकाशतीर व्यापक सी-४ आयएसआर (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स, कॉम्प्यूटर, इंटेलिजन्स, सर्व्हिलान्स आणि टोही) फ्रेमवर्कचा भाग आहे. इतर सिस्टिमसोबत तो कोऑर्डिनेशनचे काम करतो.
वायु संरक्षणासाठीचा पारंपरिक मॉडेल हा ग्राउंड-बेस्ड रडार, मानवी देखरेखीखाली प्रणाली आणि कमांड चेनद्वारे ट्रिगर होणा-या जमिनीवरून हवेत मारा करणा-या क्षेपणास्त्र बॅट-यांवर खूपच अवलंबून असतो. आकाशतीर हे मॉडेल मोडीत काढतो. आकाशतीर आपल्या सामरिक धोरणात एक नवे पर्व जोडतो, जे आतंकवादी धोक्यांप्रती केवळ बचावात्मक नाही तर सक्रिय प्रतिसाद देणा-या दृष्टिकोनाकडे वळण्याचे संकेत देतो.