तुर्कीला दणका, सेलेबी कंपनीला फटका

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तुर्कीने भारताचा शत्रू पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्याने तुर्कीच्या उत्पादनावर बहिष्काराची मोहीम सुरू झाली आहे. यासोबतच तुर्कीस्थित विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबी हावाच्या मार्केट कॅपचाही समावेश आहे. भारताच्या या निर्णयामुळे या कंपनीचे मोठे नुकसान झाले. भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांची सुरक्षा मान्यता रद्द केली. या कंपन्यांच्या समभागामध्ये २० टक्के घसरण झाली. त्यामुळे दोन दिवसांत २५०० कोटींचे नुकसान झाले.

२००९ मध्ये भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर सेलेबीने २५० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आणि १० हजारपेक्षा जास्त भारतीयांना रोजगार दिला. ही कंपनी पाच वेगवेगळ््या सहाय्यक कंपन्यांमार्फत दिल्ली, मुंबई, बेंगलुरू आणि हैदराबादसह देशभरातील ९ विमानतळांवर काम करते. त्यापैकी सर्वात मोठी सेलेबी एयरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया ६ विमानतळांवर कार्यरत होती.

सेलेबी हावा या कंपनीच्या वतीने भारतीय व्यवसायाचे महत्त्व सांगताना २०२४ मध्ये तिच्या ५८५ दशलक्ष डॉलरच्या महसुलापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त हिस्सा भारतीय सहाय्यक कंपन्यांकडून आला. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने सेलेबी एयरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाची सुरक्षा मान्यता तात्काळ प्रभावाने रद्द केली. या निर्णयामुळे देशात कार्यरत असलेल्या गटाच्या सर्व संलग्न युनिट्सवर परिणाम झाला.

बहिष्कारामुळे अडचण
भारतात ‘बायकॉट तुर्की’ मोहीम सुरु झाली. भारताच्या बहिष्कार अस्त्रानंतर तुर्कस्तानच्या कंपन्यांना चांगला फटका बसला. भारत सरकारने तुर्कस्तानची ग्राउंड हॅडलिंग सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपनी सेलेबी एव्हिएशन सिक्युरिटीला दिलेले क्लियरन्स तात्काळ रद्द केले. या कंपनीत काम करणा-या ३८०० कर्मचा-यांची नोकरी धोक्यात आली आहे.

२०२२ ला दिली होती परवानगी
भारताने तुर्कस्तानची कंपनी सेलेबी एव्हिएशनचे सिक्युरिटी क्लियरन्स रद्द केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारताने हे पाऊल उचलले. भारताने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी या कंपनीला परवानगी दिली होती. ती परवानगी आता रद्द करण्यात आली. सेलेबी एव्हिएशनकडे देशातील नऊ मोठे एअरपोर्ट आहे. त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई यासारखे संवेदनशील विमानतळ आहे. या विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग, कार्गो सेवा आणि एअरसाइड ऑपरेशनसारखे हाय सिक्योरिटी काम या कंपनीकडे होते.