अवघ्या २५ मिनिटांत धुरळा
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने इराण विरोधात ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवले. हे ऑपरेशन केवळ २५ मिनिटांत पूर्ण केले. या कालावधीत इराणच्या फोर्डो, नतान्ज आणि इस्पाहान येथील तळांवर हल्ले करण्यात आले. हे हल्ले ७ स्टील्थ बी-२ बॉम्बर्सद्वारे करण्यात आले. इराणच्या आण्विक तळांवर १२ बॉम्ब टाकण्यात आले. या ऑपरेशनमध्ये १२५ विमानांचा वापर करण्यात आला. यात फोर्डो आणि नतान्ज येथील आण्विक तलांवर १३६०८ किलोग्रॅमचे बंकर बस्टर बॉम्ब टाकले. इस्फाहानमध्ये टोमाहॉक क्रूझ मिसाईलचा वापर करण्यात आला.
अमेरिकेच्या ७ स्टील्थ बी-२ बॉम्बर्सनी मिसौरी येथील एअरबेसवरून उड्डाण घेतले. १८ तासांचे हे मिशन शांततेत पार पडले. ७ स्टील्थ बी-२ बॉम्बर्समध्ये प्रत्येक विमानात २-२ क्रू मेंबर्स होते. पूर्ण मिशन कमी कम्युनिकेशन ठेवून करण्यात आले. हे मिशन भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे ४.१० वाजता केले आणि जोरदार हल्ले करून ४.३५ वाजता अमेरिकेची विमाने इराणच्या हवाई क्षेत्राच्या बाहेर निघून गेली. इराणवर अमेरिकेने १४ बंकर बस्टर बॉम्ब, २४ टोमहॉक मिसाईलचा मारा केला.
डिकॉय मिशन