संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

yongistan
By - YNG ONLINE

९९ वे अ. भा. साहित्य संमेलन साता-यात
सातारा : प्रतिनिधी
मराठ्यांची चौथी राजधानी साता-यात तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. राजधानी साता-यात होणा-या या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
साता-यात मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साता-यात हे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले. त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित दोन्ही संस्थांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची एकमताने ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली.