सायप्रसकडून मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने गौरव

yongistan
By - YNG ONLINE
निकोसिया : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएम मोदी सध्या युरोपीयन देश सायप्रसच्या दौ-यावर आहेत. आज दौ-याच्या दुस-या दिवशी त्यांना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील २३ वे नेते आहेत. 

या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान फक्त माझा नाही, तर देशातील १४० कोटी जनतेचा आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आणि आमच्या परस्पर समंजसपणाला समर्पित करतो. सायप्रसची राजधानी निकोसियामध्ये अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस ककक देऊन सन्मानित केले.