भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ

yongistan
By - YNG ONLINE
आणखी एका भारतीयाला मिळाली संधी, 
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
जय शाह यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदावर नियुक्तीनंतर जागतिक क्रिकेटवर भारताचा प्रभाव पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आला. कारण आयसीसीच्या सीईओपदावरदेखील एका भारतीयाची निवड झाली. संजोग गुप्ता हे आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी ज्योफ एलार्डाइस यांची जागा घेतली असून, आयसीसीचे सातवे सीईओ म्हणून ते कार्यभार सांभाळतील. त्यांना मीडिया, स्पोर्ट्स आणि मनोरंजन क्षेत्रातील दोन दशकांहून अधिकचा अनुभव असून ते आयसीसीला नव्या दिशेने नेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या संजोग गुप्ता हे जिओस्टार स्पोर्ट्स अँड लाइव्ह एक्सपीरियन्सचे सीईओ आहेत. त्यांनी भारतीय स्पोर्टस इंडस्ट्रीमध्ये अनेक महत्त्वाचे प्रयोग करत बदल घडवून आणले आहेत. डिजिटल युगात प्रेक्षकांची मानसिकता समजून घेत फ्रँचायझी आधारित स्पोर्टस मॉडेल्स आणि मल्टीलँग्वेज कव्हरेजचे नेतृत्व त्यांनी केले.
संजोग गुप्ता यांनी करिअरची सुरुवात पत्रकारितेतून केली. २०१० मध्ये स्टार इंडिया (आताचे जिओस्टार) या कंपनीत प्रवेश केला आणि तिथे कंटेंट, स्ट्रॅटेजी व प्रोग्रामिंग यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या. २०२० मध्ये ते डिज्नी स्टार स्पोटर््सचे हेड बनले. त्यांच्या नेतृत्वात डिजिटल-फर्स्ट स्ट्रॅटेजी, महिलांसाठी स्वतंत्र स्पोर्टस कव्हरेज आणि स्थानिक भाषांतील ब्रॉडकास्ट यशस्वी ठरले. २०२४ मध्ये वायकॉम १८ आणि डिज्नी स्टारच्या विलयानंतर त्यांची सीईओ म्हणून जिओस्टारमध्ये नियुक्ती झाली.