ज्ञानात भर घालणारी प्रश्नावली

yongistan
By - YNG ONLINE



 


 

1 ) खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते ? 

बहिणाबाई चौधरी ✅

पद्मा गोळे

शांता शेळके

इंदिरा संत


2 ) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे

 ?

मेघालय

आसाम ✅

पश्चिम बंगाल

बिहार 


3 ) वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले ? 

रवींद्रनाथ टागोर

महंमद इकबाल

बंकिमचंद्र चटर्जी ✅

महात्मा गांधी


4 ) संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ? 

हेग ✅

पॅरिस

न्यूयॉर्क

टोकियो


5 ) दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ?

दादाभाई नैरोजी

फेडरिक एंजल्स

अलेक्झांडर पुष्किन 

कार्ल मार्क्स ✅

   

6 ) पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ?

1945

1914 ✅

1919

1935


7 ) भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो ?

28 ऑगस्ट

28 जून

28 फेब्रुवारी ✅

28 जानेवारी


8 ) भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?

लोकशाही

परिशिष्ठ 

प्रस्तावना ✅

उद्दिष्टे         


9 ) संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ? 

स्वातंत्र्याचा अधिकार ✅

समानतेचा अधिकार

1 आणि 2

यापैकी नाही 

    

10 ) भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?

अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने ✅

प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने 

नेमणुकीद्वारे 

सर्वांच्या सहमतीने


11 ) नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?

तांबडा

तपकिरी ✅

हिरवा 

निळा

   

12 ) महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?

कोल्हापूर  

मुंबई 

इचलकरंजी ✅

औरंगाबाद 

 

13 ) नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?

पुणे ✅ 

मद्रास 

डेहराडून

हैदराबाद


14 ) नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ?

बाबू गेनू

शिरीष कुमार ✅

अच्युतराव पटवर्धन

असीम कुमार


15 ) विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला ?

महर्षी कर्वे ✅

गोपाळ गणेश आगरकर 

पंडिता रमाबाई 

महात्मा फुले


16 ) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?

गदर इंडियन 

इंडिपेंडेंस लीग 

फॉरवर्ड ब्लॉक ✅

स्वराज्य पक्ष 

   

17 ) खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ?

हेलियम 

लिथियम ✅

निऑन

ऑरगॉन


18 ) क्षय : संक्रामक रोग : कॅन्सर : ?

असंक्रामक रोग ✅

संक्रमण

साथीचा रोग

यापैकी नाही


19 ) विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात ?

दिशेचे जडत्व

परिमाणाचे जडत्व

विराम अवस्थेचे जडत्व 

गतीचे जडत्व ✅   


20 ) महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? 

सहा ✅

पाच

चार 

तीन

  

21 ) महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ? 

नागपूर ✅

भंडारा 

अमरावती

चंद्रपूर 

   

22 ) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?

पूर्णा 

भीमा

भोगावती ✅

निरा 

  

23 ) ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे ?

संत तुकडोजी महाराज ✅

संत गाडगे महाराज 

संत तुकाराम महाराज

संत रामदास महाराज

  

24 ) नगरपरिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात ?

आयुक्त

जिल्हाधिकारी

महापौर ✅ 

यापैकी नाही

 

25 ) भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ?

संत रामदास

संत तुकाराम

संत जनाबाई

संत ज्ञानेश्वर ✅ 


ॠील्ली१ं’ ङल्लङ्म६’ीॅिी द४ी२३्रङ्मल्ल कल्ल टं१ं३ँ्र


26 ) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

17 सप्टेंबर ✅

13 सप्टेंबर 

15 सप्टेंबर 

19 सप्टेंबर 


27 ) मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?

स्वातंत्र्यवीर सावरकर 

न्यायमूर्ती रानडे ✅

लोकमान्य टिळक 

महात्मा फुले 


28 ) खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही ? 

साहित्य 

शांतता 

रसायनशास्त्र 

कला ✅


29 ) भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते ? 

कलम 16 

कलम 17 ✅

कलम 15 

कलम 18 


30 ) कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते ? 

सम्राट हर्षवर्धन 

सम्राट पुलकेशी 

सम्राट अशोक ✅

यापैकी नाही 


31 ) नर्मदा नदीचा उगम कोठे होतो ?

अमरकंटक ✅

भीमाशंकर 

ब्रह्मगिरी 

द्रोणागिरी 


32 ) पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?

21 एप्रिल 

26 नोव्हेंबर 

7 डिसेंबर 

21 ऑक्टोबर ✅


33 ) पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?

समवर्ती सूची 

केंद्र सूची 

राज्य सूची ✅

वरीलपैकी नाही 

 

34 ) स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो ?

मिथेन 

कार्बन मोनॉक्साईड ✅

कार्बन डाय-ऑक्साइड 

ओझोन 


35 ) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?

मुख्य कार्यकारी अधिकारी 

जिल्हा परिषद अध्यक्ष 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ✅

जिल्हाधिकारी 


36 ) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?

नागपूर 

मुंबई 

नाशिक 

पुणे ✅


37 ) विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात ?

जर्मन सिल्वर ✅

ब्राँझ 

बेलमेटल 

ॲल्युमिनियम ब्राँझ


38 ) हिमोफिलिया हा कोणता रोग आहे ?

विषाणूजन्य रोग 

अनुवंशिक रोग ✅

जिवाणूजन्य रोग 

कवक-जन्य रोग


39 ) रक्तग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते ?

ग्रॅम प्रति लिटर 

मिली ग्राम प्रति डेसिलेटर ✅

भाग प्रती दशलक्ष 

यापैकी नाही 


40 ) मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते ?

लहान आतडे 

पित्ताशय 

जठर 

मोठे आतडे ✅


41 ) लोह व ॲल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?

जांभी मृदा ✅

काळी मृदा

गाळाची मुदा

वालुकामय मृदा


42 ) ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात ?

द्रवणांक 

दवबिंदू ✅

गोठणबिंदू 

उत्कलनांक

 

43 ) स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले ?

अखिल भारतीय महिला परिषद ✅

अखिल भारतीय हिंदू महिला परिषद

अखिल भारतीय धर्म परिषद 

अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद 

  

44 ) महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत ?

वि. दा. सावरकर 

दादाभाई नवरोजी 

वासुदेव बळवंत फडके ✅

राजा राम मोहन रॉय


45 ) संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली ?

मराठवाडा

बेळगाव

पुणे

मुंबई ✅

    

46 ) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण ?

हिरालाल काटे

देवरामजी चव्हाण 

स्वामी रामानंद तीर्थ

वेद प्रकाश ✅

  

47 ) खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे ?

कपूरतला ✅

चंदिगड

कानपूर

कोची 

     

48 ) 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग बरखास्त करून त्या ऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली ती म्हणजे ?

कर आयोग 

नीती आयोग ✅

महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ 

राष्ट्रीय विकास परिषद 

 

49 ) कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे ------ कमी होते 

वस्तुमान 

आकारमान 

वजन ✅

यापैकी नाही