भारताचा इतिहास (भाग २)

yongistan
By - YNG ONLINE


दिल्ली सल्तनत ते मुघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी

दिल्ली सल्तनत ते मुघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या. महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली. उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता. बहामनी साम्राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात संघर्ष होता. 


बहामनी साम्राज्याची ५ शकले

बहामनी साम्राज्याची पाच शकले झाली. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतूबशाही, एलिचपूरची (आजचे अचलपूर) इमादशाही, बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती. त्यांच्यातही साम्राज्य विस्तारासाठी संघर्ष होत असत. या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला. आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली. मुघल बादशाहा/सम्राट शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली. मुघल आणि दक्षिण भारताच्या इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत. मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज रणजितसिंगांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य,स्वराज्याची महाराष्ट्रात स्थापना झाली, ज्याचा मुख्य उदेश भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता. शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारताच्या विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही तर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या तीन परकीय सत्तांचा प्रतिकार केला. त्यापैकी कुतूबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला.

 

मराठा साम्राज्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने/मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले/हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला. औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले. मुघल सेनापती दिलेरखानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगड वेढा घालून जिंकल्यामुळे राजाराम महाराज यांना रायगड सोडून तामिळनाडूतील जिंजीला पलायन करावे लागले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजाराम महाराज यांचा मृत्यू झाला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी छत्रपती शाहू महाराज यांना व महाराणी येसूबाई यांना मुक्त केले. छत्रपती शाहुंची व महाराणी येसूबाईची मुक्तता केली. गादीसाठी शाहू व राजारामाची पत्नी ताराबाई यांच्या युद्धात शाहूने ताराबाईचा पराभव केला. मराठा राज्याची वाटणी झाली. त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू केला. 


पेशव्यांचे साम्राज्य

मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली. महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधारी/सत्ताधीश बनले. पहिले बाजीराव पेशवे एक कर्तबगार राजकारणी होते. त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारुण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला. 


युरोपीय व्यापाऱ्यांचा शिरकाव

सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सद्देगिरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत कर्नाटकातील म्हैसूरचा सुल्तान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख राज्य/साम्राज्य व जाट राज्ये/साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले. फ्रान्सने/फ्रेंचानी पॅडिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण आणि दादरा आणि नगर हवेली हस्तगत केले. भारताची मांडलिक संस्थाने/राज्ये दत्तक वारस नामंजूर करून खालसा केली.  १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला.