नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने लावलेल्या ५० टक्के टॅरिफमुळे भारताचे ५२ लाख कोटींच नुकसान होऊ शकते. जेफरीज इक्विटी स्ट्रेटजी ग्लोबल हेडचे क्रिस्टोफर वुड यांनी हा दावा केला. ही एक ब्रोकरेज फर्म आहे. वुड यांनी आपले वीकली न्यूजलेटर ग्रीड एंड फियरमध्ये हा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या ५० टक्के टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे ५५-६० बिलियन डॉलरचे नुकसान होऊ शकते. टेक्स्टाइल, फूटवेयर, ज्वेलरी अँड जेम्स या सेक्टर्सचे सर्वात जास्त नुकसान होऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प नाराज असल्याने त्यांनी भारतावर टॅरिफ लावला, असा वुड यांनी दावा केला. मे महिन्यात भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या सीजफायरचे श्रेय ट्रम्प यांना देण्यास नकार दिला होता. भारताने जर हो म्हटले असते, तर ट्रम्प यांचा नोबेल शांती पुरस्कारासाठीचा दावा अधिक भक्कम झाला असता. रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात अपयश हेसुद्धा ट्रम्प यांच्या नाराजीचे एक कारण आहे. म्हणून रशियाकडून तेल खरेदीचे कारण पुढे करुन भारतावर टॅरिफ लावला.
भारतात शेतीत ४० टक्के वर्कफोर्स?
भारत-अमेरिका एका मोठ्या व्यापार कराराला अंतिम स्वरुप देण्याच्या जवळ असताना हा टॅरिफ लावण्यात आला. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्यांवरुन पेच आहे. शेती एक महत्त्वाचा विषय आहे. वुड यांनी भारताची बाजू घेतली. कुठलेही सरकार कृषी क्षेत्र परदेशी आयातीसाठी खुले करणार नाही. कारण याचा परिणाम थेट गरीब शेतकऱ्यांवर होईल. भारतात शेती जवळपास २५ कोटी शेतकरी आणि मजुरांसाठी उत्पन्नाचा स्त्रोत आहे. एकट्या शेतीतून भारतात ४० टक्के वर्कफोर्सला रोजगार मिळतो.
आर्थिक मंदीची भीती
वुड यांनी टॅरिफमुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली. चालू तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट फक्त ८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. अलीकडेच हा ग्रोथ रेट १०-१२ टक्के होता. एफवाय२५ मध्ये १० टक्के ग्रोथ एफवाय२६ मध्ये घटून ८.५९ टक्के राहू शकतो. कोविडची वर्ष वगळता हा मागच्या २० वर्षातील सर्वात कमी ग्रोथ रेट असेल. सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पावले उचलत आहे. आधी बजेटमध्ये इनकम टॅक्सची कपात आणि आता जीएसटीमध्ये मोठ्या बदलाची घोषणा. आता चार टॅक्स बदलून फक्त दोनच ५ टक्के आणि १८ टक्के करण्यात येणार आहेत.