मध्य-पूर्व भागाला केले लक्ष्य
दोहा : इस्रायलने कतारची राजधानी दोहावर मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी मोठा हल्ला करत हमासच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले. राजधानी दोहात स्फोटांचे आवाज ऐकायला आले. हल्ला दोहाच्या कटारा विभागात केला गेला. ज्या इमारतीला या हल्ल्यात टार्गेट केले ती संपूर्ण उद्ध्वस्त झाली. या हल्ल्याने इस्रायलने युद्धाची नवीन आघाडी सुरु केल्याची भीती व्यक्त होत आहे. कतार हे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या जवळचे राष्ट्र असून हमासचे समर्थक आहे.
इस्राईलने हा हवाई हल्ला जेरूसलेममध्ये झालेल्या गोळीबाराच्या बदल्यात घेतला आहे. या हल्यात किमान पाच इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर काही सैनिक जखमी झाले होते. हमासने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. वास्तविक, एक दिवसापूर्वी उत्तरी जेरुसलेमच्या एका गर्दीच्या चौकातील एका बस स्टॉपवर हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात किमान पाच जणांचा मृत्यू झाला होता. यात १२ जण जखमी देखील झाले होते.
इस्रायलमध्ये नागरिकांवर हल्ले
गाझातील युद्धाने इस्राईलच्या ताब्यातील वेस्ट बँक आणि इस्राईल दोन्ही भागात हिंसेत वाढ झाला आहे. पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्राईल आणि पश्चिमी तटावर इस्राईलींवर हल्ला केला आणि त्याची हत्या केली. तर पॅलेस्टाईनच्या भागात रहाणाऱ्यात हिंसेची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून इस्राईलमध्ये छोटेमोठे हल्ले झाले आहेत.