युद्ध पेटले, गाझा पट्टी बेचिराख (भाग १)

yongistan
By - YNG ONLINE
इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील हमास ही कट्टरतावादी संघटना यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. हमास या दहशतवादी संघटनेने सर्वप्रथम ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर हल्ला चढवला. हमास या पॅलेस्टिनी अरबांच्या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यामुळे मध्य-पूर्वकिंवा पश्चिम आशियातील तणाव कमी होत असल्याच्या समजाला धक्का बसला आहे. हमासचा हल्ला अमेरिकेवर अल कायदाने केलेल्या हल्ल्याइतकाच धक्कादायक आहे.

खरे तर इस्राईलमधील मोसाद नावाची गुप्तचर संस्था अत्यंत सक्षम आहे. मात्र, त्यांनाही हमासच्या हल्ल्याचा अंदाज येऊ नये, हे खरोखरच धक्कादायक आहे. एकवेळ बलाढ्य अमेरिकेवर कोणीही हल्ला करू शकत नाही, असा समज होता. मात्र, तो समज अल कायदाने फोल ठरवला. इस्राईलच्या बाबतीतही मोसाद एवढी सक्षम असताना हमासने त्यांची यंत्रणा कुचकामी ठरविली. एवढेच नव्हे, तर आयर्न डोमसारख्या अत्यंत आधुनिक आणि खर्चिक यंत्रणेलाही हमासचा हल्ला रोखता आला नाही. अरब देशांना सहज पराभूत करणा-या इस्राईलला मागील २ दशकांपासून हमास, हिजबुल्ला यासारख्या संघटनावर निर्णायक विजय मिळविता आली नाही.  

हमासने अचानक इस्राईलमध्ये धुमाकूळ घालत अनेक नागरिकांचा निर्दयीपणे बळी घेतला. यामुळे संतापलेल्या इस्राईली सैनिकांनी गाझा पट्टीवर हल्ला चढवत हमासचे अनेक अड्डे नेस्तनाबूत केले. एवढेच नव्हे, तर रॉकेट, बॉम्बचा मारा करीत संपूर्ण गाझा पट्टी उद्ध्वस्त केली. तसेच गाझा पट्टीची नाकाबंदी करून अन्न, पाणी, वीज, इंधन पुरवठा रोखला. त्यामुळे गाझा पट्टीतील नागरिक अन्न-पाण्याविना तडफडत आहेत. आता तर हमासला संपविल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला. त्यामुळे युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
खरे म्हणजे इस्राईली, पॅलेस्टिनीचा संघर्ष नवा नाही. मुळातच हमास ही इस्राईलसाठी दीर्घकालीन डोकेदुखी आहे. विशेष म्हणजे हमासमुळे पॅलेस्टिनींचेही भले होत नाही. उलट हमासमुळे पॅलेस्टिनींना सातत्याने तणावात जगावे लागते. पण इस्राईलदेखील ज्यू वस्त्या गाझा पट्टीच्या दिशेने वाढवित नेत आहे. अरबांना टाचेखाली ठेवण्याचा इस्राईलमधील यंत्रणांचा पवित्रा आहे. यातूनच हा संघर्ष अधिक पेटला गेला आहे. खरे म्हणजे ज्या हमास संघटनेवर इस्राईल सेना तुटून पडली, त्या हमास संघटनेला पॅलेस्टाईन नव्हे तर इस्राईलने जन्माला घातले. आता तेच अपत्य इस्राईलला डोईजड झाले आहे. मुळात दहशतवादाला कधीच पाठीशी घालायचे नसते. त्याला वेळीच ठेचलेकिंवा रोखले, तर भविष्यातील धोके टळतात अन्यथा त्यांचा अतिरेक एखाद्या दिवशी आपल्याच गळ््याचा फास बनते आणि आपल्याला त्यांच्या तालावर नाचवते अन्यथा मानवी जीवावर उठते. इस्राईलला याची कदाचित कल्पना नसेल. मात्र, त्यांनी पाळलेले पिल्लू आज त्यांच्या मुळावर उठले आहे.

इस्राईल आणि त्यांची गुप्तचर संस्था मोसाद यांनी पॅलेस्टाईनवर पूर्णत: ताबा मिळविण्यासाठी आणि पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांनी निर्माण केलेल्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला पूर्णत: नेस्तनाबूत करण्यासाठी हमासला कुरवाळण्याचे काम केले. त्यासाठीचा पैसा आणि शस्त्रेही मोसादने पुरविली. त्यामुळे हळूहळू हमास डोईजड होत गेला आणि आता तर थेट इस्राईलवरच हल्ला चढविला. अफगाणिस्तानमधून सोव्हिएत रशियाच्या पांिठब्यावर असलेल्या कम्युनिस्ट विचारांच्या मोहम्मद नजीबुल्ला यांचे सरकार हटवण्यासाठी आणि अफगाणिस्तानमधून सोव्हिएतच्या फौजा माघारी घालवण्यासाठी अमेरिकेने तालिबान संघटना उभारली आणि हीच तालिबान, अल-कायदासारखी दहशतवादी संघटना अमेरिकेवर उलटली. तशाच काहीसा प्रकार इस्राईलबाबत झाला आहे. त्यामुळेच आज इस्राईलवर युद्धाचा प्रसंग ओढवला गेला.  
इस्राईलविरोधात लढण्यासाठी हमासला पाठबळ देणारे अनेक शेजारी देश आहेत. त्यांनीच इस्राईल विरोधात हमासला मैदानात उतरविले आहे. पण हमासच्या अतिरेकी कारवायाच्या तीव्र झळा तेथील नागरिकांना सोसण्याची वेळ आली आहे. या तुंबळ युद्धात अनेक निष्पाप जीवांचा बळी जात आहे. गाझा पट्टीत अनेकांना अन्न-पाण्याविना तडफडण्याची वेळ आली आहे. अनेक बालकांनी आई-वडील, परिवार गमावला. त्यांना कुठे आश्रय घ्यायचा, याचा अंदाज नाही. त्यामुळे अनेक मुले, कुटुंबीय सैरभैर झाले आहेत.

 इस्राईली सैनिकांचा जोरदार रॉकेट, बॉम्बहल्ला सुरू असल्याने कुठे दडायचे आणि जीव कसा वाचवायचा, असा प्रश्न गाझा पट्टीमधील नागरिकांना पडला आहे. त्यात अन्न-पाणी नसल्याने कुठे धावताही येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. कारण इस्राईली पंतप्रधान नेतन्याहू आता आक्रमक झाले असून, हमासला कायमचा धडा शिकविण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यांना अमेरिकेची कायम साथ आहे. यासोबतच ब्रिटनसह युरोपियन देशही पाठिशी आहेत. त्याच्या जोरावर इस्राईलने आक्रमक भूमिका घेत हमासचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, हमासलाही इराण, लेबनान, सीरियासारखी देश पाठबळ देत आहेत. तसेच रशियाचाही अप्रत्यक्ष पांिठबा आहे. त्यामुळे युद्ध भडकण्याची चिन्हे असून, याचे तीव्र पडसाद जगात उमटण्याची चिन्हे आहेत.